"मोदी ब्रॅंड'चे मार्केट उतरले 

"मोदी ब्रॅंड'चे मार्केट उतरले 

मुंबई - पुलवामातील दहशतवादी हल्ल्याचा परिणाम "मोदी ब्रॅंड'च्या प्रचार साहित्यावरही झाला आहे. 2014 प्रमाणे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची "क्रेझ' नसल्याचा अंदाज मुंबईतील व्यापारी व्यक्त करत आहेत. त्यामुळेच मोदी यांच्या प्रतिमा असलेले प्रचाराचे साहित्य विकण्यास व्यापारी अद्याप तयार नाहीत. यात, मोदी छाप असलेल्या साडीचाही समावेश आहे. 2014च्या निवडणुकीत आणलेल्या साड्या सध्या विकल्या जात नसल्याचे समोर आले आहे. 

सध्या सोशल नेटवर्किंग साइट्‌सवर मोदींची प्रतिमा असलेल्या साड्या बाजारात आल्याचे व्हिडिओ व्हायरल होऊ लागले आहेत. सुरत येथील प्रिंटेट साड्यांच्या व्यापाऱ्यांनी अशा निरनिराळ्या पद्धतीच्या प्रिंटेड साड्या बाजारात विकण्यास आणल्या आहेत. परंतु, मुंबईतील व्यापाऱ्यांनी मोदी यांची प्रतिमा असलेल्या साड्या विकण्यास अद्याप सुरवात केलेली नाही. 2014 मध्ये मोदी यांची प्रचंड "क्रेझ' होती. आता तशी परिस्थिती नाही. त्यातच पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यानंतर या प्रतिमेवर अधिकच परिणाम झालेला असावा, असा अंदाज मुंबईतील व्यापारी व्यक्त करत आहेत. 

सध्या दादर येथील पानेरी दुकानात मोदी साड्यांची विक्री सुरू झालेली आहेत. एक साडी अडीच हजार रुपयांत विकली जात असून, महिलांचा प्रतिसाद चांगला असल्याचा दावा या दुकान मालकांकडून केला गेला. मात्र, या 2014 साठी घेतलेल्या साड्या होत्या, असेही त्यांनी सांगितले. 

सध्या मोदींसह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचे टी-शर्ट बाजारात उपलब्ध झाले आहेत. त्यासह शालही बाजारात आल्या आहेत. राजकीय "ट्रेंड'चा अंदाज घेण्यासाठी आम्हाला अजून तीन आठवडे जातील, त्यानंतर हळूहळू आम्ही वेगवेगळे साहित्य बाजारात आणू, असे लालबागच्या तेंडुलकर्स दुकानातून सांगण्यात आले. 

हल्ला रोखता न येणे हे अपयश 
मोदींच्या बाजूने फारसे पोषक वातावरण नसल्याने मोदी यांची प्रतिमा असलेल्या साड्या विकण्यासाठी ठेवणे सध्या तरी शक्‍य नाही, असे एका दुकानदाराने सांगितले. 

नेत्यांच्या प्रसिद्धीसाठी... 
साडी - 2500 रुपये 
टी-शर्ट - 125 रुपये 
शाल - 250 रुपये 
बिल्ले - 100 रुपये 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com