
मोदी सरकारची सरसकट खासगीकरणाची भूमिका चुकीची : पृथ्वीराज चव्हाण
कऱ्हाड : केंद्र सरकारने महावितरणचा खासगीकरण करण्याचा घाट घातला आहे. त्या विरोधात देशभरातील कंत्राटी कर्मचाऱ्यांसह संघटनांनी संप सुरु केला आहे. त्यामुळे मोदी सरकारची सरसकट खासगीकरणाची भुमिका चुकीची आहे. त्यांनीतव्रीत त्याचा फेर विचार करावा, अशी टिका माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. एका कार्यक्रमानंतर त्यानी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
श्री. चव्हाण म्हणाले, खासगीकरण होऊ नकोच आहे. त्यावर आम्हा साऱ्यांचे एकमत आहे. बँकाच्या राष्ट्रीयकरणातून सार्वजनिक क्षेत्रात मोठे उद्योग उभे राहिले. खासगीकरणाचे तोटे दिसत आहेत. त्यामुळे त्याला विरोध आहे. खासगीकरण निर्णयाला आमचा ठाम विरोधच राहिल. खासगीकरण करणे चुकीचे आहे. मग ते एसटी महामंडळाचे असो, वीज मंडळाचे असो अथवा जमिनी विकण्याचा निर्णयाचे असो त्यात झालेले सरसकट खासगीकरण चुकीचे आहे. केंद्र सरकारने सार्वजनिक उपक्रमातील पाच हजार हेक्टर जमीन विकण्याचा निर्णय घेतला आहे. तो निर्णय़ म्हणजे सरकारची दिवाळखोरीकडे वाटचाल आहे. घरचे दागिने विकून जसे घर चालवले जाते तसाच मोदी सरकार प्रकार करत आहे.
Web Title: Modi Government Privatization Wrong Prithviraj Chavan
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..