Modi Government : ‘मोदी सरकार’ची यात्रा घातक : विजय वडेट्टीवार

‘भारत सरकार’ ऐवजी ‘मोदी सरकार’ असा उल्लेख करत सुरू असलेली विकसित भारत संकल्प यात्रा लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे.
Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwarsakal

मुंबई - ‘भारत सरकार’ ऐवजी ‘मोदी सरकार’ असा उल्लेख करत सुरू असलेली विकसित भारत संकल्प यात्रा लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ पोलिस बंदोबस्तात काढण्याची नामुष्की सरकारवर ओढवली असल्याची खरमरीत टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारवर केली आहे.

ते म्हणाले, की केंद्र सरकारच्या प्रचार, प्रसिद्धीसाठी सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेच्या वाहनावर ‘मोदी सरकारची हमी’ असे शब्द लिहिले असल्यामुळे लोकांचा विरोध वाढत आहे. या योजना भारत सरकारच्या आहेत की मोदी सरकारच्या, असा सवाल जनता विचारत आहे. सरकारी यंत्रणांचाही या यात्रेच्या नियोजनासाठी वापर होतोय. त्यामुळे शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे.

त्याचबरोबर शेतकरी, युवकांमध्येही प्रचंड नाराजी आहे. आतापर्यंत विदर्भ, मराठवाडा तसेच कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, नाशिक, नंदुरबार, सातारा या जिल्ह्यांत यात्रेला विरोध झाला आहे. जनतेचा विरोध पत्करून, ही यात्रा सुरू असून जनता सरकारला धडा शिकवेल, असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com