मोदींनी महाराष्ट्र सोडताच भाजप नेते एकवटले; फडणवीसांच्या बंगल्यावर तातडीची बैठक | BJP Leaders Meeting | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BJP Leaders Meeting

मोदींनी महाराष्ट्र सोडताच भाजप नेते एकवटले; फडणवीसांच्या बंगल्यावर तातडीची बैठक

मुंबई : पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर होते. त्यांनी आज देहू येथील शिळा मंदिराचे लोकार्पण केले आहे. त्यानंतर त्यांनी मुंबईतील क्रांती गाथा, मुंबई समाचार वृत्तपत्राच्या २०० व्या वर्धापनदिनानिमित्ताने विशेष हजेरी लावली होती. पुण्याहून मुंबईला कार्यक्रमासाठी पोहोचल्यावर त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे उपस्थित होते. आजचे कार्यक्रम संपवून मोदी रवाना झाल्यावर भाजप नेत्यांनी बैठक घेतली आहे.

(BJP Leaders Meeting)

मोदींच्या आजच्या कार्यक्रमानंतर भाजप नेत्यांची विधानपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठक पार पडली. देवेंद्र फडणवीस यांच्या सागर शासकीय निवासस्थानी ही बैठक पार पडली आहे. यावेळी चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, प्रविण दरेकर असे महत्त्वाच्या नेत्यांची हजेरी होती.

हेही वाचा: विठोबाचं दर्शन घेतलं अन् वाजपेयींनी 200 कोटींचा दुष्काळ निधी जाहीर केला

दरम्यान राज्यसभेच्या निवडणुकांतील मोठ्या विजयानंतर विधानपरिषदेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. २० जूनला विधानपरिषदेच्या निवडणुका पार पडत आहेत. त्यावेळी बोलताना आशिष शेलार म्हणाले की, "ही निवडणूक नसती झाली तर बरं झालं असतं पण महाविकास आघाडीच्या अट्टहासापायी ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीची तयारी चालू असून त्यामध्ये आम्हाला १०० टक्के यश मिळणार आहे." असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

"आमचे पाचही उमेदवार निवडून येतील आणि महाविकास आघाडीची हार होईल." असं शेलार बोलताना म्हणाले आहेत.

Web Title: Modi Way Delhi Bjp Leaders Meeting Urgently Mlc Election

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top