विठोबाचं दर्शन घेतलं अन् वाजपेयींनी 200 कोटींचा दुष्काळ निधी जाहीर केला

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देहू येथील शिळा मंदिराचे लोकार्पण केलंय.
Vajpeyee
VajpeyeeSakal

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील देहू येथील शिळा मंदिराचे लोकार्पण केलंय. यावेळी त्यांनी भाषण करत तुकारामाच्या कार्याचा उल्लेख केला. या सभेसाठी वारकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. याआधीही त्यांनी पंढरपूरच्या पालखी मार्गाचे ऑनलाईन उद्घाटन केले होते. त्यामुळे त्यांचे वारकरी सांप्रदाय आणि महाराष्ट्राशी वेगळंच नातं तयार झालंय.

पण फक्त नरेंद्र मोदीच नाहीतर भाजपच्या अटल बिहारी वाजपेयी यांचेसुद्धा वारकरी सांप्रदायाशी जवळून संबंध आहेत. अटल बिहारी वाजपेयी यांनीसुद्धा अनेक वेळा पंढरपूरला भेट दिली होती. त्यांचे आणि पंढरपूरचे प्रेमाचे नाते होते. जनसंघापासून ते पंढरपूरला येत असायचे. पण २००४ मध्ये त्यांनी पंढरपूरला भेट आणि जवळपास २०० कोटी रुपयांचा दुष्काळ निधी जाहीर केला होता.

अटल बिहारी वाजपेयी विठ्ठलाचे दर्शन घेताना
अटल बिहारी वाजपेयी विठ्ठलाचे दर्शन घेतानासकाळ

साल २००४ ची गोष्ट. धनगर समाजाच्या मेळाव्याच्या निमित्ताने वाजपेयींनी पंढरपूरला भेट दिली होती. त्याअगोदर त्यांनी १९७४ मध्ये सोलापूरसह पंढरपूरचा दौरा केला होता. त्यानंतरही १९८८ मध्ये त्यांनी पंढरपूर दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी निधी देण्याचे आश्वासन दिले होते. दरम्यान १९९५ साली महाराष्ट्रात भाजप शिवसेना युती सरकार पहिल्यांदा सत्तेवर आलं होतं. १९९६ साली वाजपेयी यांनी पंढरपूरच्या रेल्वे रूंदीकरणासह अनेक निधी दिला होता. पण २००४ मध्ये ते धनगर मेळाव्यासाठी पंढरपूरात आले होते. पण त्याआधी त्यांच्याच मंत्रिमंडळातील पर्यटनंमंत्री जगमोहन यांनी २००३ मध्ये पंढरपूरचा दौरा केला होता. त्यामध्ये संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांच्या पालखीतळाचा विकासासाठी तीन कोटींचा निधी मंजूर केला होता.

अटल बिहारी वाजपेयी
अटल बिहारी वाजपेयी Sakal

चंद्रभागेच्या मैदानात त्यांची जाहीर सभा पार पडली होती. त्यावेळी तब्बल दोन ते तीन लाख एवढ्या संख्येने धनगर बांधव उपस्थित होते. या सभेत वाजपेयींनी गळ्यात ढोल बांधून वाजवला होता. आणि भाषणाच्या वेळी अटल बिहारी वाजपेयी यांनी महाराष्ट्राच्या दुष्काळ निवारण्यासाठी २०० कोटींचा निधी जाहीर केला होता. त्याआधी त्यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतलं होतं. त्या निधीमुळे दुष्काळ निवारण्यासाठी महाराष्ट्राला मदत झाली होती. त्यानंतरच्या वर्षात महाराष्ट्रात मोठा पाऊस झाला होता. त्यावेळी अनेक भागात पूराने थैमान घातलं होतं. पण आदल्या वर्षी वाजपेयींनी दिलेला दुष्काळ निधी सर्वांच्या लक्षात राहिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com