
उद्धवा,अजब तुझे सरकार ! आचार्य भोसलेंचा राणा दाम्पत्यावरील कारवाईनंतर टीका
मुंबई : अखेर राणा दाम्पत्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारविरोधात आव्हान देणे व मुख्यमंत्र्यांविरोधात अपशब्द वापरल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात भाजपचे आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले (Tushar Bhosale) यांनी उडी घेतली आहे. त्यांनी आज रविवारी (ता.२४) ट्विट करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली आहे. हिंदु हृदयसम्राटांच्या निवासस्थानी 'हनुमान चालीसा' म्हणण्याचा आग्रह धरणे म्हणजे 'राजद्रोह' ! उद्धवा, अजब तुझे सरकार !, अशी घणाघाती टीका भोसले यांनी राणा दाम्पत्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल केल्यानंतर केली आहे. ( Tushar Bhosale Criticize Chief Minister Uddhav Thackeray For Action Against Rana Couple)
हेही वाचा: राज्यात तणाव! PM मोदींच्या कार्यक्रमाला CM ठाकरे मारणार दांडी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करणारच असा पण नवनीत राणा आणि रावी राणा यांनी केली होता. अखेर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याचे कारण पुढे करित हनुमान चालिसा पठण करण्याचा निर्धार मागे घेतला. खार पोलिसांनी राणा दाम्पत्याला चौकशीसाठी पोलिस ठाण्यात नेले. येथेच त्यांना अटक करण्यात आली. समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
हेही वाचा: राणा दाम्पत्याला न्यायालयीन कोठडी; काय झाला युक्तीवाद?
राणा दाम्पत्याला अटक केल्यानंतर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी रात्री त्यांची भेट घेतली. यावेळी सोमय्या यांच्या वाहनावर दगड फेक करण्यात आली. आमच्यावर त्यांनी वाहन चढवली असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केली आहे.
Web Title: Tushar Bhosale Criticize Chief Minister Uddhav Thackeray For Action Against Rana Couple
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..