Mohit Kamboj I मला काही झालं तर संजय पांडेंना उत्तर द्यावं लागेल, कंबोज यांचं खळबळजनक ट्विट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

politics

'आज अखेर मला पोलिस दलाकडून कोणताच प्रतिसाद आलेला नाही'

मला काही झालं तर संजय पांडेंना उत्तर द्यावं लागेल, कंबोज यांचं खळबळजनक ट्विट

काल भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर खार पोलिस स्टेशन परिसरात शिवसैनिकांनी दगडफेक केली. खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांची भेट घेण्यासाठी सोमय्या पोलिस स्टेशनला गेले असता हा प्रकार घडला. यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तपालं. यावर भाजपातून अनेक तिखट प्रतिक्रिया येत आहे. दरम्यान, या हल्ल्याला पोलिस कमिश्नर संजय पांडे (PC Sanjay Pandey) जबाबदार असून त्यांनी हा हल्ला घडवून आणाला असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. आता या वादात भाजपाच्या मोहित कंबोज यांनी उडी घेतली असून त्यांनी एक खळबळजनक माहिती दिली आहे.

हेही वाचा: राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणार नाही - देवेंद्र फडणवीस

मोहित कंबोज यांनी एक ट्विट केलं आहे. यात ते म्हणतात, गेल्या ६ महिन्यांपासून मी मुंबई पोलिस आयुक्तांना माझ्या सुरक्षेबाबत अगणित पत्रे लिहिली आहेत. पण आजतागायत पोलिस दलाकडून कोणताच प्रतिसाद आलेला नाही. मला रोज धमक्या येतात. माझ्यावर हल्लेही होतात, हे जंगलराजच आहे, जिथे लोकांचे ऐकले जात नाही!, यादरम्यान जर मला काहीही झाले तर त्याचे उत्तर संजय पांडे यांना उत्तर द्यावे लागले, असा इशारा कंबोज यांनी दिला आहे. त्यामुळे त्यांच्या या ट्विटमुळे आता संजय पांडे यांच्या अडचणीत वाढ होणार का अशी चर्चा सुरु आहे.

हेही वाचा: 'कायदा सुव्यवस्था धोक्यात, केंद्रात जाण्याआधी फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना भेटावं'

दरम्यान, सोमय्या यांनी मुंबई पोलिस कमिश्नर संजय पांडे यांच्यावर आरोप केला आहे. सोमय्या म्हणालेत की, मी पोलिस स्टेशनमध्ये जाताना शिवीगाळ केली होती, त्यामुळे पोलिस ठाण्यातून बाहेर पडल्यावर शिवसैनिकांनी (Shivsainik) माझ्यावर हल्ला केला आहे. मी पोलिस ठाण्यात जाणार याची माहिती पोलिसांनी याआधीच शिवसैनिकांना देण्यात आली होती. ठाकरे सरकारकडून (Thackeray Govt.) माझ्यावर हल्ल्यासाठी मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

Web Title: Mohit Kamboj Says Any Harmful Incidence With Mi Responsible Of Mumbai Cp Sanjay Pandey

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top