'महाआघाडी सरकार कोर्टाच्या आदेशांची अमंलबजावणी का करत नाही'

मोहित कंबोज यांनीही या वादात उडी घेतली आहे.
मोहित कंबोज
मोहित कंबोजgoogle
Summary

मोहित कंबोज यांनीही या वादात उडी घेतली आहे.

राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे काढा अन्यथा दुप्पट आवाजात मशिदीसमोर लाऊड स्पीकरवर हनुमान चालीसा वाजवणार असा इशारा राज्यसरकारला दिला होतो. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यारून सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राज ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात त्यांचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. आता मोहित कंबोज यांनीही या वादात उडी घेतली आहे. आज त्यांनी एक ट्विट करत महाराष्ट्र सरकारला सवाल केला आहे.

ट्विटमध्ये ते म्हणतात, 2005 मध्ये न्यायालयाने निर्देश दिले होते मश्जिदी वरील भोंगे काढायाचे. मग अजून अंमलबजावणी का होत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, काल त्यांनी मंदिरावर हनुमान चालिसा वाजवण्यासाठी ज्यांना भोंगे हवेत त्यांनी आम्ही निशुल्क देवू. ज्यांना लावायचे आहेत त्यांनी बिनधास्त भोंगे लावावे. हिंदु एकतेचा आवाज घुमलाच पाहिजे असे वादग्रस्त ट्विट केले होते.

मोहित कंबोज
'महाआघाडी सरकारच्या महसुल खात्याचं नाव आता वसुली खाते करावं'

आता या ट्विटमुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यातील वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महाराष्ट्रातील जातीपातीच्या राजकारणाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. १९९९ ला राष्ट्रवादी पक्षाचा जन्म झाल्यानंतर महाराष्ट्रातील (Maharahtra) जातीपातीचं राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू झाले असे गंभीर आरोप त्यांनी केले आहेत.

राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर घाटकोपर येथे मशिदी समोर भोंग्यावर (स्पिकरवर) हनुमान चालीसा वाजवली गेली. या घटनेमुळे घाटकोपर परिसरात मनसे आक्रमक झाली होती. दरम्यान, चांदिवली विधानसभा मतदारसंघातील मनसे कार्यालयाबाहेर महेंद्र भानुशाली (Mahendra Bhanushali) यांनी भोंगे लावले होते. पोलिसांनी सांगूनही भानुशाली यांनी भोंगे उतरवण्यास नकार दिल्याने पोलिसांनीच कार्यालयाबाहेरील भोंगे उतरवले आणि महेंद्र भानुशाली यांना ताब्यात घेतलं होतं.

मोहित कंबोज
पुन्हा राज्यपाल-महाआघाडी संघर्ष? मुंबई विद्यापीठ कुलगुरू नेमणूक प्रक्रिया सुरु

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com