'महाआघाडी सरकारच्या महसुल खात्याचं नाव आता वसुली खाते करावं'

अमर्याद भ्रष्टाचार हाच महाविकास आघाडी सरकारचा कॉमन मिनिमम प्रोग्रॅम आहे.
Chitra Wagh
Chitra Waghटिम ई सकाळ
Summary

अमर्याद भ्रष्टाचार हाच महाविकास आघाडी सरकारचा कॉमन मिनिमम प्रोग्रॅम आहे.

मागील काही दिवसांपासून राजकीय वातावरणात अनेक बदल झाले आहेत. राजकीय कुरघोड्यांमुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोपप्रत्यारोप पहायला मिळत आहेत. दरम्यान, आता भाजपाच्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. दरम्यान, पुण्यात बोगस गुंठेवारी दस्तनोंदणीच्या रॅकेटमध्ये ४४ अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या संगनमताने तब्बल १० हजार बोगस दस्त नोंदणी झाल्याचं उघड झाले आहे. यावरून चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारने महसूल खात्याचे नाव बदलून आता वसूल खाते करावे, अशी बोचरी टीका केली आहे.

Chitra Wagh
Share Market: शेअर बाजारात उसळण; सेन्सेक्स निफ्टी पुन्हा तेजीच्या वाटेवर

पुण्यात दस्तनोंदणीद्वारे कोट्यवधी रूपयांचा गैरव्यवहार झाला आहे. (fake Gunthewari docus) यासंदर्भात त्यांनी एक ट्विट केलं आहे. यात त्या म्हणतात, पुण्यात बोगस गुंठेवारी दस्तनोंदणीच्या रॅकेट मध्ये ४४ अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या संगनमताने तब्बल १० हजार बोगस दस्त नोंदणी झाल्याचं उघड झाले आहे. अमर्याद भ्रष्टाचार हाच महाविकास आघाडी सरकारचा कॉमन मिनिमम प्रोग्रॅम आहे. त्यामुळे सरकारने महसूल खात्याचे नाव बदलून आता वसूल खाते करावे, अशी टीका केली आहे. राज्यातील दुय्यम निबंधक कार्यालयातील 44 अधिकाऱ्यांवर नोंदणी महानिरिक्षक श्रावण हर्डीकर यांनी निलंबन आणि विभागीय चौकशीची कारवाई केली.

Chitra Wagh
ठाकरे सरकार इन अ‌ॅक्शन मोड! राऊतांच्या आरोपानंतर ED विरोधात तपास सुरू

दरम्यान, सरकारने बंदी घातल्यानंतर आणि गुंठेवारीची दस्त नोंदणी केल्यास कायदेशीर कारवाईचे आदेश दिले होते. तरीही एकट्या पुणे शहर आणि जिल्ह्यात तब्बल 44 दुय्यम निबंधक आणि कर्मचाऱ्यांनी संगनमताने 10 हजार 561 बोगस गुंठेवारीच्या दस्त्यांची नोंदणी केली आहे. 400 हून अधिक गुंठेवारीचे दस्त नोंदणी करणाऱ्या दुय्यम निबंधकांना त्वरीत निलंबीत करण्याचे आदेश देण्यात आलेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com