Molestation Of School Girl In Akola: शालेय पोषण आहार बनवणाऱ्या व्यक्तीचा 9 वर्षांच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न

Akola ZP School Girl Molestation: हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कुटुंब जिल्हा परिषद शाळेत पोहचले तेव्हा तेथे मोठा गोंधळ झाला. या दरम्यान आरोपी चंद्रमणी चव्हाण शाळेच्या भिंतीवरून उडी मारून पळाला
 Molestation Of School Girl In Akola
Molestation Of School Girl In AkolaEsakal

राज्यातील जिल्हा परिषदांच्या शाळा सुरू होऊन अवघे काही दिवसच झाले असून, शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच अकोल्यातून अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे. येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय पोषण आहार बनवणाऱ्या 52 वर्षांच्या व्यक्तीने 9 वर्षीय मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आहे.

अकोला शहरातल्या गुडधी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणात अकोला शहरातल्या सिव्हिल पोलीस ठाण्यात शालेय पोषण आहार मदतणीस म्हणून कार्यरत असलेल्या चंद्रमणी चव्हाण याच्याविरुद्ध बाल संरक्षण कायद्याअंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल आहे.

 Molestation Of School Girl In Akola
Dhule-Solapur Highway Accident: धुळे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

आरोपी चंद्रमणी चव्हाण अनेक वर्षांपासून गुडधीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय पोषण आहार मदतणीस म्हणून कार्यरत आहे. 4 जून रोजी चव्हाण शाळेमध्ये विद्यार्थ्यांना खिचडी वाटप करत असताना त्याने एका 9 वर्षीय विद्यार्थ्यांनीला ज्या खोलीत खिचडी बनवली जाते तिथे नेले, त्या खोलीत आरोपीने विद्यार्थीनीचा विनयभंग केला.

 Molestation Of School Girl In Akola
Ravindra Waikar: "गैरसमजातून गुन्हे दाखल केले," सर्व गुन्हे मागे घेत रवींद्र वायकरांना मुंबई पोलिसांची क्लीन चीट

या घटनेनंतर मुलगी भीली होती आणि त्यामुळे सलग दोन दिवस ती शाळेत जात नसल्यामुळे घरच्यांनी तिच्याकडे विचारणा केली असता मुलीने घडलेला सर्व प्रकार तिच्या आईला सांगितला आणि हा प्रकार समोर आला.

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कुटुंब जिल्हा परिषद शाळेत पोहचले तेव्हा तेथे मोठा गोंधळ झाला. या दरम्यान आरोपी चंद्रमणी चव्हाण शाळेच्या भिंतीवरून उडी मारून पळाला. सद्या या प्रकरणात सिव्हिलियन पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून, पुढील तपास सुरू आहे तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्याध्यापकांनी देखील या संदर्भात एक अहवाल तयार करून जिल्हा परिषद शिक्षण अधिकाऱ्यांकडे पाठवला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com