‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’चा अर्ज भरताना घेतले पैसे! सोलापुरातील दोन नेट कॅफे चालकांवर फसवणुकीचे गुन्हे

महिलांकडून १०० व २०० रुपयांचे शुल्क घेतल्याप्रकरणी सोलापूर शहरातील दोन इंटरनेट कॅफे चालकांवर सदर बझार पोलिसांत फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. प्रगती व योगेश्वर इंटरनेट कॅफे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
solapur
Solapur Crime.sakal
Updated on: 

सोलापूर : ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेचे अर्ज कोणतेही शुल्क न आकारता भरण्यासंदर्भात राज्य शासनाचे थेट आदेश असतानाही अर्ज भरायला आलेल्या महिलांकडून १०० व २०० रुपयांचे शुल्क घेतल्याप्रकरणी सोलापूर शहरातील दोन इंटरनेट कॅफे चालकांवर सदर बझार पोलिसांत फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. प्रगती व योगेश्वर इंटरनेट कॅफे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

राज्य शासनाच्या या योजनेसाठी महिलांकडून ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज भरून घेतले जात आहेत. त्यानंतर पात्र महिलांना राज्य शासनाच्या तिजोरीतून दरमहा दीड हजार रूपये मिळणार आहेत. सामान्य कुटुंबातील महिलांना योजनेअंतर्गत अर्ज करताना अडचणी येवू नयेत, त्यांच्याकडून कोणीही विनाकारण शुल्क आकारू नये, यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यासह जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनीही दिले आहेत. सध्या इंटरनेट कॅफे, महा ई-सेवा केंद्रे, अंगणवाड्यांसह अनेकजण मोबाइलवरूनही लाभार्थींचे अर्ज भरत आहेत.

ज्यांच्याकडून योजनेचे अर्ज भरले जातील, त्यांना शासनाकडून प्रतिअर्ज ५० रुपये शुल्क दिले जाणार आहे. तरीसुद्धा शहरातील सात रस्ता परिसरातील दोन नेट कॅफे चालकांनी लाभार्थी महिलांकडून १०० व २०० रुपयांचे शुल्क घेतले. या प्रकरणी मंडळ अधिकारी सारिका कल्याण वाव्हाळ यांनी दोन्ही कॅफे चालकांविरूद्ध सदर बझार पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार शनिवारी रात्री त्या दोघांविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक नितीन शिंदे तपास करीत आहेत.

प्रांताधिकाऱ्यांचे आदेश अन्‌ तहसीलदारांकडून कारवाई

सात रस्ता परिसरातील प्रगती व योगेश्वर नेट कॅफेत ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेतून अर्ज भरणाऱ्या महिलांकडून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी १०० रुपये व २०० रुपये घेतले जात असल्याची खबर गुप्तवार्ता विभागाकडून सोलापूर उत्तरचे प्रांताधिकारी सदाशिव पडणे यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी उत्तर तहसीलदारांना संबंधित नेट कॅफेविरूद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले. तहसीलदारांनी मंडल अधिकारी सारिका वाव्हाळ यांना खात्री करून गुन्हे दाखल करण्याविषयी निर्देशित केले. त्यानुसार खात्री करून त्यांनी सदर बझार पोलिसांत फिर्याद दिली. दोन्ही नेट कॅफे अधिकृत महा ई सेवा केंद्रे नसल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ladki Bahin Yojana August installment
Ladki Bahin Yojana e-KYC
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana Payment Status
Marathi News Esakal
www.esakal.com