Monsoon Maharashtra 2026 : मॉन्सून केरळमध्ये ४ दिवस आधीच पोहोचणार, पण महाराष्ट्रात कधी दाखल होणार? नवी अपडेट समोर

India weather update : यावर्षी मान्सून २६ मे २०२६ रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे अरबी समुद्रातील कमी दाबामुळे मान्सूनच्या प्रगतीत व्यत्यय येऊ शकतो. जूनमध्ये पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
Dark monsoon clouds approaching Kerala coast signaling early onset of southwest monsoon 2026 in India.

Dark monsoon clouds approaching Kerala coast signaling early onset of southwest monsoon 2026 in India.

esakal

Updated on

मान्सूनच्या आगमनाची शेतकऱ्यांसह सर्वांनाच आतुरता लागली आहे. यावर्षी केरळमध्ये मान्सूनचे आगमन लवकर होणार असले तरी देश व्यापायला बरेच दिवस लागू शकतात.अरबी समुद्रात संभाव्यतः निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनच्या प्रगतीमध्ये अडथळा आणणारे वारे वाहू शकतात. सुरुवातीला असा अंदाज वर्तवण्यात आला होता की, मान्सून १८ मेपर्यंत अंदमान भागात पोहोचेल; परंतु, या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनच्या आगमनास विलंब झाला आहे. मान्सूनच्या आगमनासाठी आता नवीन तारखा जाहीर करण्यात आल्या असून, त्यानुसार जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com