4 जूनला मान्सून केरळमध्ये; महाराष्ट्रात लांबण्याची शक्यता

4 जूनला मान्सून केरळमध्ये; महाराष्ट्रात लांबण्याची शक्यता

नवी दिल्ली: यंदा मान्सून महाराष्ट्रात उशीरा दाखल होण्याची शक्यता आहे. ही माहिती स्कायमेटकडून देण्यात आली असून 4 जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज स्कायमेटकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे 10 जूनपर्यंत मुंबईत दाखल होणारा मान्सून लांबण्याची शक्यता आहे.

स्कायमेटचे शास्त्रज्ञ सुशांत पुराणिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 जूनपर्यंत मान्सून मुंबईत दाखल होणार असा अंदाज होता पण तो आता लांबणीवर जाणार आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार असून जुलैनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं. पण यंदा महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती बिकट राहिल अशी माहितीही त्यांनी दिली.

यंदा 93 टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाजही स्कायमेटकडून वर्तविण्यात आला आहे. 22 मे रोजी मान्सून अंदमान निकोबारमध्ये दाखल होणार आहे. त्यानंतर 4 जूनपर्यंत तो केरळमध्ये दाखल होईल तर जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल अशी माहिती स्कायमेटकडून देण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com