Monsoon Latest Update : दिवसभरात राज्यात अन् देशात काय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लीकवर

Maharashtra monsoon live update
Radhanagari Dam Kolhapur Rain News
Radhanagari Dam Kolhapur Rain Newsesakal

राधानगरी घरणातून विसर्गानंतर, आता स्वयंचलित दरवाजे बंद

राधानगरी धरणाचे स्वयंचलित पाच दरवाजे खुले झाले होते. त्यातील एक दरवाजा शुक्रवारी पहाटे चार वाजता 3 नंबरचा बंद झाला. त्यांनतर रात्री आठ वाजता 4, 7 नंबरचे दरवाजे बंद झाले. तर काहीच वेळाच म्हणजे आठ वाजून पंधरा मिनिटांनी 5, 6 नंबरचे दरवाजे ही बंद झाले. राधानगरी धरणाचे उघडलेले सर्व स्वयंचलित दरवाजे बंद झाले आहेत.

राधानगरी धरणाचा जलस्तर वाढला, ४२५६ क्युसेकच्या वेगाने विसर्ग सुरु

महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने रौद्र रुप धारण केलंय. अनेक ठिकाणी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून काही ठिकाणी पूर देखील आलाय. अशातचं, कोल्हापुर जिल्ह्यातील राधानगरी धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. पाणी पातळी वाढल्याने धरणाछ्या दोन दरवाजांमधून ४२५६ क्युसेक वेगाने विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

बुलढाणा जिल्ह्यात पावसाचं थैमान, पूरात एका व्यक्तीला वाचवण्यात यश

महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. विदर्भात अनेक नद्यांना पूर आलाय. तर बुलढाणा जिल्ह्यातही पावसाने हैदोस घातलाय. नदीला आलेल्या पूरात एक व्यक्ती वाहून जाताना दिसला, त्याला वाचवण्यात यश आलंय.

चंद्रपुर शहराला पूराचा तडाखा, अनेक गावांचा संपर्क तुटला

सध्या चंद्रपुर शहरामध्ये पूराने हाहाकार माजवला आहे. या ठिकाणी २४ तासांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. पूरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. इरई धरणातून विसर्ग सुरु करण्यात आलाय.

त्याचबरोबर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळंत आहे. यामध्ये गोंदिया, गडचिरोली यांचा समावेश आहे.

दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग

गंगापूर धरणाच्या पाणीसाठ्यात आठ टक्क्यांनी वाढ

नाशिक : यावर्षीच्या हंगामात पहिल्यांदाच गंगापूर धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. काल सायंकाळी धरणातील पाणीसाठा वाढल्याने पाचशे क्यूसेक पाणी सोडण्यात आले. रात्री धरण पाणी पातळीत आठ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

सातारा जिल्ह्यात सरासरी 11.8 मि.मी. पावसाची नोंद

सातारा - जिल्ह्यात सरासरी 11.8 मि.मी. पावसाची नोंद झाली असून 1 जूनपासून आतापर्यंत एकूण सरासरी 373.1 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस एकूण सरासरीच्या 42.1 टक्के इतका आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. सर्व आकडे मि.मी.मध्ये असून कंसातील आकडे आतापर्यंतच्या एकूण पावसाचे आहेत. सातारा – 11.1 (384.7), जावली-मेढा – 16.9(684.0), पाटण -23.2 (711.2), कराड –13.4 (210.4), कोरेगाव – 5.8 (171.7), खटाव - वडूज – 6.7 ( 136.2), माण - दहिवडी -2.4 (117.8), फलटण – 3.2 (86.0), खंडाळा -4.1 (123.7), वाई -9.5 (288.2), महाबळेश्वर -41.4 (1950.1) या प्रमाणे पाऊस झाला आहे.

महाबळेश्वर-सातारा मार्गावरील जावळीच्या केळघर घाटात कोसळली दरड; एकेरी वाहतूक सुरू

आज सकाळी 8.15 वाजता महाबळेश्वर-सातारा मार्गावरील जावळीच्या केळघर घाटात दरड कोसळली. उपविभागामार्फत दरड काढण्याचे काम सुरु असून एकेरी वाहतूक सुरू आहे.

Radhanagari Dam Kolhapur Rain News
Kelghar Ghat : महाबळेश्वरला जात असाल, तर जरा थांबा! 'या' घाटात कोसळलीये दरड, रस्त्यावर आलीये दगड-माती

राजाराम बंधारा पाणीपातळी 41 फुटांवर, कोल्हापुरात 70 बंधारे पाण्याखाली

आज सकाळी 10:00 वा. राजाराम बंधारा पाणी पातळी 41ʼ2'' (542.73m) आली आहे. नदीपात्रात 60870 क्यूसेक विसर्ग होत आहे. (पंचगंगा नदी इशारा पातळी 39'00" व धोका पातळी - 43'00") एकूण 70 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

कोल्हापूर- गगनबावडा रस्त्यावरील बालिंगा पूल वाहतुकीसाठी खुला

बालिंगा : जिल्हा प्रशासनाने बालिंगा पूल (Balinga Bridge) वाहतुकीसाठी बंद केल्याने पाच तालुक्यातील जनतेची गैरसोय झाली. याबाबत राजेंद्र सूर्यवंशी यांनी आंदोलन केले, तसेच करवीरचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी मुंबईत मंत्रालयात पालकमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेऊन कोल्हापूर- गगनबावडा रस्त्यावरील वाहतूक सुरू करावी, अशी मागणी केली. याबाबत पालकमंत्र्यांनी कोल्हापुरात जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याबाबत निर्णय घेत दुपारी तीनच्या सुमारास रस्ता वाहतुकीस सुरू केला.

Radhanagari Dam Kolhapur Rain News
Balinga Bridge : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर कोल्हापुरातील 'हा' मुख्य मार्ग वाहतुकीसाठी खुला; अवजड वाहनांना बंदी!

मुंबईतील शाळा, महाविद्यालयांना आज सुटी नाही; अफवांवर विश्वास न ठेवण्याचं शासनाचं आवाहन

मुंबई महानगरातील महानगरपालिकेच्या, तसेच सर्व शासकीय आणि खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच सर्व महाविद्यालये आज शुक्रवार दिनांक २८ जुलै २०२३ रोजी नियमित सुरू आहेत. मुंबईसाठी आज पावसाचा येलो अलर्ट आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने आज शाळा, महाविद्यालये यांना कोणतीही सुटी जाहीर केलेली नाही. आज (२८ जुलै २०२३) सुटी जाहीर केल्याचे एक बनावट पत्र समाज माध्यमातून प्रसारित झाले आहे, त्यावर कृपया विश्वास ठेवू नये, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.

कोकणसह घाटमाथा, विदर्भात जोरदार पावसाचा इशारा

पूर्व किनारपट्टीवरील कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे विदर्भासह राज्यात पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. २८) कोकण, घाटमाथा, आणि विदर्भात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा जिल्ह्यांचा घाटमाथा, विदर्भातील भंडारा, गोंदियामध्ये जोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ हवामान विभागाने दिला आहे.

मुंबई महानगरात सरासरी असा झाला पाऊस

काल (२७.०७.२०२३) सकाळी ८ ते आज (२८.०७.२०२३) सकाळी ८ या कालावधीत मुंबई महानगरातील सरासरी पाऊस : मुंबई शहर- १००.८२ मिमी. पूर्व उपनगरे- ९४.७९ मिमी. पश्चिम उपनगरे- १२९.१२ मिमी.

मंडणगडातील भोळवली धरणाला लागली गळती

मंडणगड : तालुक्यातील (Mandangad) भोळवली येथील धरणाच्या (Bholavali Dam) भिंतीला यंदाच्या पावसात गळती लागल्याने पाटबंधारे विभाग दापोली यांनी २६ जुलैला ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर धरणात साठलेल्या पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

पावसामुळे मुंबईची लाईफलाईन लोकल सेवा विस्कळीत; चाकरमान्यांचे हाल

राज्यात आज अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट जाहीर करण्यात आलाय. मुंबईत कालपासून मुसळधार पाऊस सुरुच आहे. पावसामुळे मुंबईकरांची पुरती दाणादाण झालीये. पावसामुळे मुंबईची लाईफलाईन लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. सकाळपासूनच चाकरमान्यांचे हाल होत आहेत. 

यवतमाळमध्ये 36 तर भंडाऱ्यात सरासरीपेक्षा 25 टक्के अधिक पाऊस

विदर्भातील नऊ जिल्ह्यात पावसाने सरासरी ओलांडली आहे. विदर्भात 1 जून ते 27 जुलैपर्यंत 495.8 मिमी पाऊस झाला आहे, या कालावधीत 446 मिमीच्या अपेक्षेपेक्षा सरासरी 11 टक्के अधिक पाऊस झाला आहे. यामध्ये यवतमाळ 36 तर भंडाऱ्यात सरासरीपेक्षा 25 टक्के अधिक पाऊस झाला आहे.

तेवीस दिवसात भरले राधानगरी धरण

गेल्या दहा-बारा दिवसात पावसाने संततधार सुरु ठेवल्याने राधानगरी धरण अवघ्या तेवीस दिवसात भरुन वाहु लागले. तर काळम्मावाडी धरणामध्ये दि.४ जुलै रोजी १.८५ टी.एम.सी.पाणीसाठा होता व त्यादिवशी अखेर ३५७ मि.मी.पावसाची नोंद झाली होती. पण आज या धरणामध्ये १५.३८ टी.एम.सी.पाणीसाठा असुन आज अखेर १२१५ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे.

बुलढाण्यात पांडव, जटाशंकर नदीला पूर

बुलढाणा : सातपुड्याच्या पायथ्याशी तासाभरापासून जोरदार पाऊस सुरु आहे. पांडव नदी, जटाशंकर नदीला पूर आला आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या अनेक गावांत पाणी शिरले आहे. नदी काठच्या गावांनी सतर्क राहावे, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

चांदोली धरणाचे चारही दरवाजे खुले

सांगली / वारणावती : चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे काल दुपारी धरणाचे उर्वरित दोन्ही दरवाजे खुले केले असून, सध्या धरणाच्या चारीही दरवाजातून वारणा नदी पात्रात विसर्ग सुरू केला आहे.

Radhanagari Dam Kolhapur Rain News
Chandoli Dam : चांदोली धरण क्षेत्रात मुसळधार, चारही दरवाजे खुले; वारणा, कृष्णेच्या पातळीत होणार वाढ!

आलमट्टीतून विसर्ग दीड लाखावर; कोल्हापूर, सांगलीला दिलासा

बेळगाव : आलमट्टी धरणातून गुरुवारी (ता. २७) सायंकाळी ६.३० वाजता १ लाख ७५ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणात ८९.८०० टीएमसी पाणी साठा झाला असून, आवक १ लाख ६५ हजार ८३३ क्युसेक इतकी आहे. धरण ७२.९६ टक्के भरले आहे. विसर्ग वाढविल्यामुळे कोल्हापूर, सांगलीला तूर्तास दिलासा मिळाला आहे.

Radhanagari Dam Kolhapur Rain News
Almatti Dam : महाराष्ट्र शासनाचं लक्ष असलेल्या 'आलमट्टी'तून दीड लाखांवर विसर्ग; कोल्हापूर, सांगलीला महापुराचा धोका?

चंदूरमध्ये पंचगंगा नदीचे पाणी शिरले नागरी वस्तीत

कबनूर : चंदूर (ता. हातकणंगले) येथील पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. पाणी नागरी वस्तीत शिरले आहे. नदी परिसरातील ११० नागरिकांना स्थलांतर करावे, अशा नोटिसा प्रशासनाकडून दिल्या आहेत.

कोयना धरणात ६५.४३ टीएमसी साठा

पाटण : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. आज नवजा परिसरात दोनशे मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जलाशयाचा एकूण पाणीसाठा ६५.४३ टीएमसी झाला असून, जलाशयात प्रतिसेकंद ३६ हजार क्युसेक पाण्याची आवक होत आहे.

Radhanagari Dam Kolhapur Rain News
Koyna Dam Update : कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून 2 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग; महाबळेश्वरला 158 मिलिमीटर पावसाची नोंद

मुंबईत धुवांधार; कोकणासह पुणे, सातारा, गोंदिया जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट

Monsoon Latest Live Update : सध्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावलीये. काही भागात पूरस्थिती निर्माण झाल्यामुळं जनजीवन विस्कळीत झालंय. मुंबईसह उपनगर आणि ठाणे परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं सखल भागात पाणी साचलं आहे, त्यामुळं वाहतुकीवर परिणाम होत असल्याचं चित्र दिसत आहे. तसेच कोकणसह विदर्भातील काही जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढला आहे.

Radhanagari Dam Kolhapur Rain News
Weather Update: कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात आज मुसळधार, वाचा हवामान विभागाचा अंदाज

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. तर ठाणे जिल्ह्याला देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. तसेच गोंदिया जिल्ह्याला देखील ऑरेंज अलर्ट आहे. त्याचबरोबर सिंदुधुर्ग, कोल्हापूर, विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com