Kelghar Ghat : महाबळेश्वरला जात असाल, तर जरा थांबा! 'या' घाटात कोसळलीये दरड, रस्त्यावर आलीये दगड-माती

जावळी तालुक्यात आठवडाभरापासून जोरदार पाऊस, दरडी कोसळण्याचं प्रमाण वाढलं
Landslide in Kelghar Ghat Javali
Landslide in Kelghar Ghat Javaliesakal
Summary

आज पहाटेच्या सुमारास वरोशी गावच्या हद्दीत चौपाळा शिवारात घाटात दरड कोसळून दरडीचे दगड रस्त्यावर आल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

केळघर : सातारा जिल्ह्याच्या पश्चिम विभागात पडत असलेल्या संततधार पावसामुळं आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास दरड कोसळून काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागानं तातडीनं केळघर घाटात (Kelghar Ghat) जेसीबी पाठवून वाहतूक सुरळीत केली.

मशिनरीच्या साहाय्यानं एका बाजूनं रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. जावळी (Javali) तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून पावसानं जोर धरला आहे. त्यामुळं डोंगरदऱ्यातून पावसाचे पाणी रस्त्यावर येत आहे. तसेच केळघर घाटात दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढू लागले आहे.

Landslide in Kelghar Ghat Javali
Koyna Dam Update : कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून 2 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग; महाबळेश्वरला 158 मिलिमीटर पावसाची नोंद

आज पहाटेच्या सुमारास वरोशी गावच्या हद्दीत चौपाळा शिवारात घाटात दरड कोसळून दरडीचे दगड रस्त्यावर आल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. मोठ्या वाहनांना वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होत होता. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता डी. एच. पवार यांनी तातडीने घाटात जेसीबी पाठवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.

Landslide in Kelghar Ghat Javali
Solapur Airport : विमानतळाच्या लायसनसाठी लागणार 'इतक्या' महिन्यांचा कालावधी; DGC कडून परवानगी आवश्यक, 50 कोटींची गरज

दरम्यान, परिसरात पाऊस जास्त झाल्याने काही ठिकाणी नाले न खोदल्याने पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहते. सातत्याने रस्त्यावरून पाणी जात असल्याने घाटातील रस्ता निसरडा झाल्याने दुचाकी वाहनांचे अपघात होत आहेत. तसेच वर्दळीच्या केळघर घाटात वाहनांची नेहमी गर्दी असते.

Landslide in Kelghar Ghat Javali
Koyna Dam : 25 वर्षांपासून 'ताकारी'चं भवितव्य कोयना धरणावर अवलंबून; 'या' चिंतेनं शेतकऱ्यांच्या तोंडचं पळालं होतं पाणी

मात्र, नागमोडी वळणाच्या ठिकाणी दिशादर्शक फलक व रिप्लेक्टर नसल्याने घाटात वाहने चालवताना चालकांना वळणांचा अंदाज येत नाहीत. काही ठिकाणी अवघड वळणांवर संरक्षक कठडे नसल्यानेही अपघातांना निमंत्रण मिळत आहे. "बांधकाम विभागाने दक्ष राहून केळघर घाटातील रखडलेली कामे पूर्ण करावीत, अशी मागणी वाहन चालकांमधून होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com