Monsoon : कोकण, मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’

राज्यात सर्वदूर मॉन्सून पोहोचल्याने अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. कोकणासह, घाटमाथ्यावर पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत.
Rain
Rainesakal

पुणे - राज्यात सर्वदूर मॉन्सून पोहोचल्याने अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. कोकणासह, घाटमाथ्यावर पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. आज (ता. २७) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित हलक्या ते जोरदार पावसाचा अंदाज आहे.

Rain
Pune Crime : कंपासमधील कटरने गळ्यावर वार करत डोक्यात घातला दगड; राहुल हंडोरेने दिली कबुली

पावसाच्या हजेरी, ढगाळ हवामानामुळे राज्याच्या कमाल तापमानात घसरण होत आहे. सोमवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विदर्भातील अकोला येथे राज्यातील उच्चांकी ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात बुहतांश ठिकाणी तापमान २७ ते ३६ अंशाच्या दरम्यान होते. राज्यात सर्वदूर पावसाने हलक्या ते मध्यम हजेरी लावली असून, कोकणात पावसाचा जोर कायम आहे.

अंतर्गत ओडिशा, दक्षिण झारखंड, उत्तर छत्तीसगड परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, त्याला लागूनच समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. या प्रणालीपासून वायव्य राजस्थानपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. गुजरातच्या किनाऱ्यालगत अरबी समुद्रात चक्राकार वारे वाहत असून, दक्षिण गुजरात पासून केरळपर्यंत किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

Rain
Mumbai Crime : लाच स्वीकारताना महापालिकेच्या अभियंत्याला अटक

आज (ता. २७) कोकणात पावसाचा जोर कायम राहणार असून, कोकणासह मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा, विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे.

वायव्य भारतात मॉन्सूनची प्रगती

यंदा केरळसह देशात यंदा काहीसा उशिराने दाखल झालेल्या मॉन्सूनने वेगाने घोडदौड देशाचा बहुतांशी भाग व्यापला आहे. सोमवारी (ता. २६) वायव्य भारतात मॉन्सूनने प्रगती केली असून, जम्मू काश्मिर, लडाख व्यापून, उत्तर अरबी समुद्र, गुजरात, राजस्थान, हरियाना, पंजाबच्या आणखी काही भागात मॉन्सून दाखल झाला आहे.

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) - पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे, सातारा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया.

जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट) - सिंधुदुर्ग, कोल्हापूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली.

विजांसह पावसाचा इशारा (यलो अलर्ट) - बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com