मॉन्सूनने व्यापला निम्मा महाराष्ट्र

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जून 2019

नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) आज मोठा पल्ला गाठत राज्याचा जवळपास निम्मा भाग व्यापला. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात प्रगती करत मॉन्सूनने नगर, औरंगाबाद, नागपूरपर्यंत मजल मारली आहे. कोकणात मात्र मॉन्सून रत्नागिरीपर्यंतच रेंगाळला आहे. येत्या ४८ तासांमध्ये मॉन्सून उर्वरित महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

नगर, औरंगाबाद, नागपूरपर्यंत मजल
पुणे - नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) आज मोठा पल्ला गाठत राज्याचा जवळपास निम्मा भाग व्यापला. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात प्रगती करत मॉन्सूनने नगर, औरंगाबाद, नागपूरपर्यंत मजल मारली आहे. कोकणात मात्र मॉन्सून रत्नागिरीपर्यंतच रेंगाळला आहे. येत्या ४८ तासांमध्ये मॉन्सून उर्वरित महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 

मुसळधारेची शक्यता
राज्याच्या दक्षिण भागात मॉन्सूनने आगमन झाल्यानंतर राज्यात पाऊस जोर धरण्याची शक्यता आहे. दोन ते तीन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज असून, पुणे परिसरातही पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Monsoon Rain Environment Maharashtra