
राज्यातील काही भागांत पावसाने मागील तीन दिवसांत जोरदार हजेरी लावली आहे. आज 23 जून रोजी कोकणातील रायगड, रत्नागिरी, आणि सिंधुदुर्ग मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे, तर मुंबई ठाणे आणि पालघरमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर घाटमाथ्यावर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.