मॉन्सून 15 मेच्या सुमारास दक्षिण अंदमानात दाखल होणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 मे 2017

पुणे - नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) अंदमानात दाखल होण्यास पोषक स्थिती निर्माण होत आहे. मॉन्सून 15 मेच्या आसपास दक्षिण अंदमानात दाखल होण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

पुणे - नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) अंदमानात दाखल होण्यास पोषक स्थिती निर्माण होत आहे. मॉन्सून 15 मेच्या आसपास दक्षिण अंदमानात दाखल होण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

दरम्यान, येत्या पावसाळ्यातील दुसऱ्या टप्प्यातील दीर्घकालीन पावसाचा यंदा 20 मे रोजी जाहीर होण्याची शक्‍यता पुणे हवामान विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केली. मॉन्सून यंदा सर्वसाधारण बसरेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने आधीच दिला आहे.

सर्वसाधारणपणे मॉन्सून 15 मेच्या दरम्यान मॉन्सून दक्षिण अंदामानात दाखल होऊन 20 मेपर्यंत संपूर्ण अंदमान व्यापत असतो. यंदाही 15 मेच्या दरम्यान तो दक्षिण अंदामानात येण्यास वातावरण अनुकूल असल्याची सुवार्ता हवामान विभागाने दिली आहे.

गेल्या वर्षी मॉन्सून 18 मे रोजी अंदमानात दाखल झाला होता. त्यानंतर 20 मे पर्यंत मॉन्सूनने अंदमानाचा संपूर्ण भाग व्यापला होता. नंतर तो तीन जून रोजी बंगालच्या उपसागरात दाखल झाला होता व केरळमध्ये 8 जून रोजी दाखल झाला. कर्नाटकात 9 जूनला पोचल्यानंतर मुंबईमार्गे न येता थेट पूर्व विदर्भात 18 जून रोजी दाखल झाला होता. तर 20 जून रोजी मॉन्सून संपूर्ण महाराष्ट्रात दाखल झाला होता.

महाराष्ट्रातून 22 ते 25 ला मॉनसूनने गुजरात, मध्य प्रदेश मार्गे उत्तर प्रदेशपर्यंत पोचल्यानंतर 5 ते 12 जुलै दरम्यान मॉन्सूनने दिल्ली, राजस्थानसह संपूर्ण देश व्यापला होता. यंदाही मॉन्सूनसाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे वेळेवर मॉन्सून येण्याची शक्‍यता आहे, असा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Monsoon to reach Andaman by 15th May, says IMD