Monsoon Rain Update: पुणे-मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाची हजेरी, 'या' जिल्ह्यांत अलर्ट जारी; मान्सूनचा परतीचा प्रवास तीन दिवस आधीच सुरु

Monsoon Rain: रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांसह पुणे, साताऱ्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. तर उर्वरित भागांत विजांसह सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
Heavy monsoon rains lash Pune, Mumbai and coastal Maharashtra as IMD issues orange and yellow alerts.

Heavy monsoon rains lash Pune, Mumbai and coastal Maharashtra as IMD issues orange and yellow alerts.

esakal

Updated on

Summary

  1. मान्सूनचा परतीचा प्रवास यंदा ३ दिवस आधी सुरू झाला असून राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे.

  2. मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, साताऱ्यासह अनेक जिल्ह्यांत ऑरेंज व येलो अलर्ट जारी केला आहे.

  3. कोकण, पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाने वाहतुकीवर परिणाम, तर उत्तर महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी आहे.

मॉन्सूनच्या पश्चिम राजस्थानातून परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. यातच राज्यात पावसाने जोर धरला आहे. मुंबई आणि पुण्यासह राज्यात सर्वदूर पावसाचा जोर वाढला आहे. दरम्यान आज राज्यात वादळी वारे, विजांसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांसह पुणे, साताऱ्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. तर उर्वरित भागांत विजांसह सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com