सरकारच्या अट्टाहासाने नागपूर अधिवेशनात फज्जा

Monsoon session cancelled due to lack of electricity
Monsoon session cancelled due to lack of electricity

नागपूर, ता. 6 : पावसाळी अधिवेशन अट्टहासाने नागपूरला घेतल्यानंतर आज पहिल्याच पावसात विधीमंडळाचे अधिवेशन स्थगित करावे लागले. रात्रभर पडलेल्या पावसामुळे विधानभवनच्या पॉवर हाऊसमधे पाणी साचले आणि त्यामुऴे संपुर्ण वीज बंद करण्याची नामुष्की ओढावली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच पावसामुळे अधिवेशन बंद करावे लागले.

पॉवर हाऊस मधे पाणी गेल्याने धोक्याचा इशारा म्हणून जनरेटर देखील सुरू करण्यास अधिकाऱ्यांनी मज्जाव केला त्यामुळे विधानभवनात येणारे अधिकारी, कर्मचारी व नागरिकांच्या ओळखपत्राची मोबाईलच्या बॅटरीमधून तपासणी करण्यात येत होती.

विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या निष्काळजीपणावर टिका केली. अजित पवार यांनी संताप व्यक्त करत कशाला केला होता अट्टहास ? मुहूर्तावर अधिवेशन घेतले तरी संकट टाळता आले नाही काय ? असा सवाल केला. नागपूर महापालिकेची चौकशी करा, अशी मागणी शिवसेना आमदाराने केली. विधानभवनाचे हे हाल तर महाराष्ट्राचे काय हाल असतील असा सवाल विरोधी आमदार सत्ताधारी आमदारांना विधानभवन आवारात विचारत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com