पावसाळी अधिवेशनासाठी विरोधकांच्या ऐक्‍यात असमन्वय..! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

राज्यात सरकारला घेरणारे शेकडो मुद्दे समोर असल्याचा दावा करणाऱ्या विरोधकांमधील असमन्वय उघड झाला आहे. आज (मंगळवार) विरोधी पक्षांच्या पत्रकार परिषदेला काँग्रेस-राष्ट्रवादी वगळता इतर विरोधीपक्षांचे कोणीही गटनेते उपस्थित नसल्याने आश्‍चर्य केले जात आहे.  

नागपूर : राज्यात सरकारला घेरणारे शेकडो मुद्दे समोर असल्याचा दावा करणाऱ्या विरोधकांमधील असमन्वय उघड झाला आहे. आज (मंगळवार) विरोधी पक्षांच्या पत्रकार परिषदेला काँग्रेस-राष्ट्रवादी वगळता इतर विरोधीपक्षांचे कोणीही गटनेते उपस्थित नसल्याने आश्‍चर्य केले जात आहे.  

परंपरेप्रमाणे विरोधीपक्षांच्या पत्रकार परिषदेला मागील सर्व अधिवेशन काळात काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत शेतकरी कामगार पक्ष, माकप, समाजवादी पक्ष, कपिल पाटील व अपक्षाचे प्रतिनिधी हजर असतात. अधिवेशनाला सामोरे जाताना विरोधकांमध्ये एकी असल्याचे हे संकेत मानले जातात. मात्र, आज झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते व जोगेंद्र कवाडे वगळता इतर पक्षातील एकही नेता अथवा गटनेता हजर नसल्याने याबाबत आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 

Web Title: Monsoon Session of Legislative Assembly