esakal | राज्यात पुढच्या चार ते पाच दिवसात मुसळधार पावसाची शक्यता
sakal

बोलून बातमी शोधा

Monsoon

राज्यात पुढच्या चार ते पाच दिवसात मुसळधार पावसाची शक्यता

sakal_logo
By
सुधीर काकडे

राज्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. राज्यात यापुर्वी झालेल्या पावसाची झालेल्या पावसात अनेक ठिकाणी शेतीचे, नुकसान झाले तसेच पुरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यातच आता पुन्हा एकदा पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढच्या काही दिवसांत महाराष्ट्रात (Maharashtra) जोरदार पाऊस (Monsoon Updates) होणार असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात पुढील 4-5दिवसात महाराष्ट्रात पावसाची वाढ अपेक्षित आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. येत्या 5 दिवसांत हवामानात बदल पाहायला मिळणार असून, मोठ्या प्रमाणात पाऊस होणार आहे, असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

हेही वाचा: शासनाच्या प्रस्तावावर विचार करुन पुढचा निर्णय घेऊ- राजू शेट्टी

दरम्यान, मागच्या काही दिवसांत झालेल्या पावसाने राज्यातील धरणांची पातळी वाढली आहे. पावसाने अनेक ठिकाणी शेतीचे आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसाने झाले आहे. सध्या बंगालच्या उपसागरात पश्‍चिम- मध्य आणि वायव्य भागात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होत असून ते दक्षिण ओडिशापासून उत्तर आंध्र प्रदेश किनारपट्टीपर्यंत आहे. तर उत्तरेकडे मॉन्सूनची आस असलेला कमी दाबाचा पट्टा हा पुढील ४८ तासांमध्ये दक्षिणेकडे प्रवास करेल. परिणामी राज्यातील विविध भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.

loading image
go to top