'मोंथा' चक्रीवादळ किनारपट्टीला धडकल्यानंतर त्याची तीव्रता कमी झाली आहे. दरम्यान, आंध्र प्रदेशातील तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तेलंगणा, विदर्भाकडे सरकणार आहे. त्यामुळे गुरुवारी (ता. ३०) विदर्भात हलक्या ते जोरदार सरींची शक्यता आहे. ही वादळी प्रणाली आंध्र प्रदेश, तेलंगणा, दक्षिण छत्तीसगड, विदर्भातून मार्गक्रमण करताना कमी दाब क्षेत्रात रूपांतरित होणार आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे आंध्र प्रदेश व तेलंगणात तशी ३५ ते ५५ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची, वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे.