राज्यातील धरणांमध्ये निम्म्याहून अधिक पाणीसाठा पण...

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 8 August 2020

राज्यात जून महिन्यात पावसाने हजेरी लावली. मात्र, जुलै महिन्यात पश्चिम महाराष्ट्रासह काही भागात पावसाने ओढ दिली होती. परंतु गेल्या चार-पाच दिवसांपासून दमदार पाऊस होत आहे. त्यामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.

पुणे : राज्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये समाधानकारक पाऊस होत असून, जलाशयातील पाणीपातळीत वाढ होत आहे. धरणांमध्ये यंदा आजअखेर 54 टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी याच तारखेस 66.53 टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्यात जून महिन्यात पावसाने हजेरी लावली. मात्र, जुलै महिन्यात पश्चिम महाराष्ट्रासह काही भागात पावसाने ओढ दिली होती. परंतु गेल्या चार-पाच दिवसांपासून दमदार पाऊस होत आहे. त्यामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. राज्यातील 141 मोठ्या प्रकल्पांमध्ये सध्या निम्म्यापेक्षा अधिक म्हणजे 53.65 टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी 65.57 टक्के इतका पाणीसाठा होता. मध्यम 258 प्रकल्पामध्ये सुमारे 45 टक्के पाणीसाठा असून, गतवर्षीच्या (38 टक्के) तुलनेत अधिक आहे. तर, राज्यातील 2 हजार 868 लघु प्रकल्पांमध्ये सुमारे 20 टक्के पाणीसाठा असून, गतवर्षीच्या तुलनेत सुमारे दोन टक्‍क्‍यांनी अधिक आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील कोयना धरणात सुमारे 64 टक्के, वारणामध्ये सुमारे 81 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. तसेच, सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाच्या उपयुक्त पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत असून, पाणीसाठा 19 टक्‍क्‍यांवर आला आहे. मात्र, गतवर्षी उजनी धरणात या तारखेस सुमारे 98 टक्के पाणीसाठा होता.

राज्यात नवीन महाविद्यालयांना मान्यता; पदवी अभ्यासक्रमाच्या जागा वाढणार

औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पात गतवर्षी इतकाच पाणीसाठा आहे. नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह धरणात गतवर्षी पाणीसाठा शून्यावर होता. त्यात यंदा चांगली वाढ झाली आहे. भंडाऱ्यातील गोसीखुर्द, नगर जिल्ह्यातील भंडारदरा नाशिकमधील गिरणा, पुणे जिल्ह्यातील काही धरण वगळता बहुतांश धरणांमध्ये निम्म्यापेक्षा अधिक पाणीसाठा झाला आहे. 

प्रमुख धरणांतील पाणीसाठा टीएमसीमध्ये आणि टक्केवारी (कंसात गतवर्षीची टक्केवारी) :
जायकवाडी 42.42    55.33 (54.33) 
गोसीखुर्द 14.19    54.42 (43.44) 
तोतलाडोह 31.33    87.29 (0.01) 
भंडारदरा 6.6.   59.01  (95.04)
गिरणा 11.97    48.46  (53.77) 
राधानगरी 7.77    100 (97.87) 
दूधगंगा 19.56    81.71 (89.90) 
वारणा 22.25    80.96 (95.79) 
कोयना 63.89    63.81 (97.38) 
उजनी 9.95    18.57 (97.35) 

रायगड जिल्हा परिषदेत कोरोनाचा धुडगूस; अँटिजेन तपासणीत इतक्या जणांना लागण झाल्याचे उघड 

पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला ही चारही धरणे पूर्ण क्षमतेने (29.15 टीएमसी) भरली होती. परंतु यावर्षी या धरणांमध्ये 55 टक्के म्हणजे सुमारे 16 टीएमसी इतका साठा आहे.

पुणे जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठा : 
टेमघर 1.30    35.18 (100) 
वरसगाव 6.52    50.85 (99.96)
पानशेत 6.53    61.50 (99.96) 
खडकवासला 1.69    85.77   (100) 
भामा आसखेड 3.70    48.73 (99.72) 
डिंभे 5.33    42.70 (96.67) 
चासकमान 1.68    22 (100) 
नीरा देवघर 5.73    48.85 (95.28) 
भाटघर 14.30    60.88 (98.63) 

 

मलबार हिलचे सर्वेक्षण सुरु; जलवाहिन्या दुरूस्तीच्या कामामुळे रविवारपर्यंत या परिसरात टॅंकरने पाणी पुरवठा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: More than half of the water storage in the dams in the Maharashtra