बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाने सरासरी ओलांडली 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

पुणे - राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने बहुतांश जिल्ह्यांमध्ये सरासरी ओलांडली आहे. नंदूरबार आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली असल्याची माहिती हवामान खात्याने सोमवारी दिली. दरम्यान, पुढील चोवीस तासांमध्ये राज्याच्या बहुतांश भागात श्रावणधारांची हजेरी लागेल, असेही हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले. 

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्रामुळे पाऊस सक्रिय झाला आहे. राज्यात पुढील चोवीस तासांमध्ये सर्वदूर पावसाची शक्‍यता असून, कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भासह मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी मुसळधारेचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे, तर येत्या शुक्रवारपासून (ता. 22) पावसाचा जोर पुन्हा ओसरणार असून, कोकणसह अनेक ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची शक्‍यता आहे. 

विदर्भातील गडचिरोली, मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांत सोमवारी दमदार पाऊस पडला. या भागातील नद्या, नाले, ओढ्यांना पूर आले. नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत सुरू असलेल्या पावसाने धरणांमधील पाण्याची पातळी वाढली आहे. 

Web Title: Most of the districts exceeded the average rain