esakal | Motivational Story : नांदेडचे भूमिपुत्र, शौर्य पदक विजेते मुकुंद सरसर कर्नलपदी
sakal

बोलून बातमी शोधा

कर्नल मुकुंद सरसर

Motivational Story : नांदेडचे भूमिपुत्र मुकुंद सरसर कर्नलपदी

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : महाराष्ट्रातील युवक व युवतीनी देशसेवेसाठी सैन्यात भरती व्हावे. कठोर व शिस्तप्रिय खात्यात देशसेवा करताना जो आनंद व मान- सन्मान मिळतो तो आपले जीवन नक्कीच उज्वल करतो. तरुणांनी आपले स्किल, जिद्द व फोकस डेव्हलप केल्यास सैन्य भरतीत सहज प्रवेश करता येतो. आपल्या मातीला जपत देशसेवेसाठी तरुणांनी सैन्यात दाखल व्हावे असे आवाहन नांदेडचे भुमिपुत्र तथा शौर्य पदक विजेते कर्नल मुकुंद सरसर यांनी 'सकाळ'शी बोलतांना केले.

नांदेड शहराच्या होळी भागात राहणारे व नुकतेच कर्नलपदी विराजमान झालेले मुकुंद माधवराव सरसर यांच्या पदोन्नतीमुळे नांदेडचे नाव देशपातळीवर कोरल्या गेले. नांदेड भूषण कर्नल मुकुंद सरसर यांनी जम्मू काश्मीर येथे 1997 मध्ये पाकिस्तानी आतंकवादी युध्दात फार मोठी असाधारण कामगिरी केली. यामध्ये भारतीय सैन्यांचे प्राण वाचवून 10 ते 12 आतंकवादी याना कंठस्नान घातले. या कामगिरीची दखल घेत भारत सरकारने त्यांना सन १९९८ मध्ये शौर्य पदक देऊन गौरविले होते. राष्ट्रपतीद्वारे त्यांना हे पदक प्रदान करण्यात आले होते.

हेही वाचा - काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी सीआरपीएफ आणि पोलिसांच्या संयुक्त पथकावर हल्ला केला. यामध्ये दोन नागरिकही मृत्यूमुखी पडले आहेत.

नांदेड जिल्ह्यातील एकमेव सैन्य अधिकारी कर्नल पदापर्यंत गेले आहेत. त्यांचे शिक्षण महात्मा गांधी मिशन नांदेड येथे झाले आहे. त्यानंतर त्यांनी सीडीएस परीक्षाद्वारे सैन्य अधिकारी पदाची परिक्षा दिली. अत्यंत कठीण असलेल्या या परिक्षेत ते पहिल्याच प्रयत्नात उतिर्ण झाले आणि अधिकारी झाले. सध्या कर्नल मुकुंद सरसर हे अहमदनगर येथे EMEया कोरमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या पदोन्नतीबद्धल नांदेडकरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे कमलाकर शेटे यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

येथे क्लिक करा - जीडीएमओ आणि स्पेशलिस्ट पदांसाठी वॉक-इन-इंटरव्यू

सैन्य भरतीसाठी ज्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मी नेहमी उपलब्ध आहे. नांदेड किंवा मराठवाड्यातील नव्हे राज्यातील विद्यार्थ्यांनी देशसेवेसाठी सैन्य दलात दाखल व्हावे. देशसेवा करुन आपल्या मायभूमीची मान उंचवावी असे कर्नल सरसर म्हणाले. सैन्य भरतीचे मार्गदर्शन मी स्वत: मोफत देण्याचा संकल्प केला आहे. सैन्यात जाण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांनी माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

loading image
go to top