राज्यातील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर पोलिस दलाला सज्ज करण्याच्या हालचाली सुरु

राज्यातील अस्थिरतेच्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर पोलिस दलाला अधिक सज्ज राहण्याच्या दृष्टीने आता वरिष्ठ स्तरावरुन प्रयत्न सुरु झाले आहेत.
Police Force
Police ForceSakal
Summary

राज्यातील अस्थिरतेच्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर पोलिस दलाला अधिक सज्ज राहण्याच्या दृष्टीने आता वरिष्ठ स्तरावरुन प्रयत्न सुरु झाले आहेत.

बारामती - राज्यातील अस्थिरतेच्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर पोलिस दलाला अधिक सज्ज राहण्याच्या दृष्टीने आता वरिष्ठ स्तरावरुन प्रयत्न सुरु झाले आहेत. दंगलसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता विचारात घेता आता पोलिस दलालाही त्या दृष्टीने सज्ज केले जात आहे.

आज बारामतीतही टीसी महाविद्यालयाच्या मैदानावर जमाव पांगविण्यासाठी पोलिसांनी काय केले पाहिजे याचे प्रशिक्षण वरिष्ठ अधिका-यांनी दिले. जमाव जमला तर परिस्थिती कशी हाताळायची, कधी बळाचा वापर करायचा किंवा अश्रूधुराच्या नळकांड्या कधी फोडायच्या या बाबत माहिती दिली गेली.

बारामती उपविभागामध्ये येणा-या सर्वच पोलिस ठाण्यांच्या अधिकारी व कर्मचा-यांना या प्रशिक्षणात सहभागी करुन घेण्यात आले होते. सकाळी साडेआठ वाजल्यापासून ते साडेदहा वाजेपर्यंत हे प्रशिक्षण सुरु होते.

आणीबाणीची वेळ आल्यास इतर पोलिस ठाण्यांकडून तात्काळ किती वेळात मदत येते, तसेच फायर ब्रिगेड, वैद्यकीय मदत व पोलीस दलामध्ये समन्वय राहून घटनास्थळी किती वेळात पोहोचतात याची चाचणी घेण्यात आली. लाठीचार्ज कसा करावा, तसेच अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्या बाबत पोलिसांना प्रशिक्षण मुख्यालयामधील राखीव पोलीस निरीक्षक यांनी दिले.

सदरचे प्रशिक्षण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख व अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या सूचनेनुसार व बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले.

यावेळी पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, तैयबु मुजावर, सोमनाथ लांडे बीराप्पा लातूरे यांच्यासह शंभरहून अधिक पोलिसांनी यात सहभाग घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com