सभापतिपदासाठी भाजपकडून 8 वेळा आमदार राहिलेले सतीश महाना भरणार अर्ज; सपा नाही देणार उमेदवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bjp mla satish mahana

माजी मंत्री सतीश महाना आज भाजपकडून उमेदवारी दाखल करणार आहेत.

सभापतिपदासाठी भाजपकडून 8 वेळा आमदार राहिलेले सतीश महाना भरणार अर्ज

उत्तर प्रदेश विधानसभेच्या (Uttar Pradesh Legislative Assembly) अध्यक्षपदासाठी आज (सोमवार) नामांकन प्रक्रिया होणार आहे. ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सतीश महाना (Satish Mahana) आज भाजपकडून (BJP) उमेदवारी दाखल करणार आहेत. मात्र, सपाकडून (SP) उमेदवार उभा केला जाणार नाहीय. वास्तविक, यूपी निवडणुकीच्या (Uttar Pradesh Assembly Election) निकालात भाजपला स्पष्ट बहुमत मिळालंय. अशा स्थितीत सतीश महाना हे विधानसभेचे अध्यक्ष होतील, असं मानलं जातंय.

तर, दुसरीकडं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) आज सकाळी 11 वाजता आमदार म्हणून शपथ घेतील. त्यानंतर मुख्यमंत्री योगी 10.30 वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याचं समजतंय. दरम्यान, सतीश महाना हे मागील सरकारमध्ये मंत्री होते. मात्र, यावेळी त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं नाहीय. परंतु, महाना यांना विधानसभा अध्यक्ष केलं जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. सतीश महाना हे 8 वेळा आमदार राहिले आहेत. 2012 पासून ते कानपूरच्या महाराजपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत.

हेही वाचा: आमदार आराधना मिश्रा सांभाळणार काँग्रेस विधिमंडळाची कमान

याआधी त्यांनी कानपूर कॅंटमधून 5 वेळा निवडणूक जिंकलीय. या निवडणुकीत सतीश महाना यांनी सपाचे फतेह बहादूर सिंह गिल यांचा पराभव केलाय. सतीश महाना हे त्यांच्या भागातील अत्यंत लोकप्रिय नेते मानले जातात. सतीश महाना यांचा जन्म 14 ऑक्टोबर 1960 रोजी कानपूर इथं झाला. विद्यार्थी जीवनापासून ते बजरंग दल युवा आणि विश्व हिंदू परिषदेशी संबंधित होते. महाना 1991 पासून सलग 8 वेळा आमदार झाले आहेत.

Web Title: Bjp Mla Satish Mahana Will File Nomination For Up Assembly Speaker Up Election

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top