संभाजीराजेंचे आरक्षणाच्या वक्तव्यावरून घूमजाव

वृत्तसंस्था
शनिवार, 22 जून 2019

- आरक्षण गेले खड्ड्यात असे केले होते वक्तव्य.

- सर्वत्र टीका झाल्यानंतर केले घूमजाव.

कोल्हापूर : राष्ट्रपती नियुक्त खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आरक्षणाबाबत काल (शुक्रवार) वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर नेटिझन्सकडून मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर टीका करण्यात येत होती. त्यानंतर आता त्यांनी त्यांच्या या वक्तव्यावरून घूमजाव केला. 

संभाजीराजे यांनी काल ट्विटरवरून 'आरक्षण गेलं खड्ड्यात, पदवीपर्यंत शिक्षण मोफत करा', असे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर त्यांना ट्रोल करण्यात आले. विविध माध्यमातून त्यांच्यावर टीकाही करण्यात येत होती. त्यानंतर अखेर त्यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, आरक्षणाबाबत केलेले वक्तव्य हे उद्विग्न मनस्थितीतून केले गेले.  

तसेच ते म्हणाले, आपण आरक्षणाविरोधात नाही तर पदवीपर्यंत शिक्षण मोफत करावे, अशी माझी मागणी आहे. खासगीकरणात आज गरिब, बहुजनांसाठी चांगले शिक्षणापासून दूर व्हावे लागत आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Sambhaji Raje changes his Stand On Reservation