शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर मोदींचा फोटो लावल्याने भडकले संभाजीराजे, म्हणाले...

MP Sambhajiraje gets angry on video viral of PM Modi and Amit Shah
MP Sambhajiraje gets angry on video viral of PM Modi and Amit Shah

मुंबई : पुस्तकाचा वाद मिटला नाही तेवढ्यातच आता 'तानाजी' चित्रपटातील व्हिडिओ मॉर्फ करून तो व्हायरल करण्यात आला. या व्हिडिओत शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर मोदींचा चेहरा, नरवीर तानाजी मालुसरेंच्या चेहऱ्यावर अमित शहांचा चेहरा तर उदयभान राठोड यांच्या चेहऱ्यावर अरविंद केजरीवालांचा चेहरा मॉर्फ करण्यात आला आहे. दिल्ली निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या या व्हिडिओवर सगळ्यांच स्तरांतून टीका झाली. आता या व्हिडिओवर खासदार छत्रपती संभाजीराजे यांनीही नाराजी व्यक्त करत ट्विट केले आहे. तसेच ज्यांनी हा व्हिडिओ व्हायरल केला आहे, त्यांच्यावर केंद्र सरकारने लवकरात लवकर कारवाई करावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे. 

संभाजीराजे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हणलं आहे की, 'पुस्तक झालं आता व्हिडीओ आला. अशोभनीय, असहनिय तसेच निंदनीय. संबंधित पक्षाने यावर आपली भूमिका स्पष्ट करावी. केंद्र सरकारने चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी.' असे एक ट्विट त्यांनी केले, त्यानंतर त्यांनी आणखी एक ट्विट केले आहे. 'आम्हा शिवभक्तांसाठी महाराज सर्वस्व आहेत. शिवभक्तांच्या भावना तीव्र आहेत. सरकारची जबाबदारी आहे, आमच्या भावनांची कदर करत अश्या गोष्टी होऊ नयेत यासाठी दक्षता घ्यावी. सर्व राजकीय पक्षांना-कार्यकर्त्यांना विनंती आहे, कोणीही गलिच्छ राजकारणासाठी महाराजांच्या प्रतिमेचा गैरवापर करु नये.' अशा कडक शब्दांत त्यांनी सुनावले आहे. तसेच सरकारची जबाबदारी आहे, त्यांनी लवकरात लवकर या संबंधीत व्यक्तींवर कारवाई करावी अशीही मागणी केली आहे.

पॉलिटीकल कीडा या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. जसा कोंढाणा जिंकला तशीच आता दिल्ली जिंकयाची असे काही संवाद या व्हि़डिओत घेतलेत. तर, 'शाहीन बाग से उन्होंने वोट बँक की राजनिती शुरू की है, आखरी दांव हम खेलेंगे,' असाही संवाद या व्हिडिओत घेतला आहे. तर व्हिडिओच्या शेवटी 'शाह जी' असे नाव लिहिले आहे.

भाजपच्या अधिकृत अकाऊंटवर हा व्हिडिओ नसला तरी दिल्ली निवडणूकीच्या प्रचारानिमित्त हा व्हिडिओ व्हायरल केला जात आहे.  हा व्हिडिओ 19 जानेवारीला पोस्ट करण्यात आलाय. त्यानंतर सोशल मीडियावर या व्हिडिओवरून नाराजी व्यक्त केली जात आहे. तर शिवाजा महाराजांच्या चेहऱ्यावर मोदींचा चेहरा लावल्याने पुन्हा एकदा त्याची तुलना केली असल्याचा आरोप नेटकरी करत आहेत. 'आज के शिवाजी : नरेंद्र मोदी' या पुस्तकात शिवरायांची तुलना मोदींशी केली होती. हा वाद संपत नव्हता, तोच आता व्हिडिओवरून वाद सुरू झालेला बघायला मिळतोय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com