तो कुठे राहतो, कोणाच्या घरात राहतो? पवारांना भेटताच राऊतांचा सदावर्तेंना इशारा

Sanjay Raut vs Gunratna Sadavarte
Sanjay Raut vs Gunratna Sadavarte esakal
Summary

सध्या ठाकरे आणि पवारांच्या विरोधात गरळ ओकण्याचा प्रयत्न सुरूय.

मुंबई : राज्यात एसटी कामगारांचा संप गेल्या ४ महिन्यापासून सुरूय. मात्र, शुक्रवारी एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST Workers Strike Maharashtra) चिघळला. एसटी कर्मचाऱ्यांनी काल शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घराबाहेर आंदोलन केलं. अचानक झालेल्या या आंदोलनामुळं एकच खळबळ उडाली. पोलीस यंत्रणांना देखील याबाबत कोणतीही माहिती मिळाली नव्हती. शरद पवारांच्या घरावर झालेल्या या हल्ल्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी (Udhav Thackeray) चौकशीचे आदेश दिलेत. पोलिसांनी आता या प्रकरणात कारवाईला सुरुवात केलीय. या प्रकरणानंतर पोलिसांनी अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांना अटक केलीय.

शरद पवारांच्या घरावर झालेल्या या आंदोलनावर अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिलीय. शरद पवारांच्या घरावरील हल्ला आम्ही कदापि सहन करणार नाही. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) हा भाजपचा नेता असून तो कुठं राहतो, कोणाच्या घरात राहतो, त्याला आर्थिक पाठबळ कोणाचं आहे याचा आम्ही शोध घेणार आहोत. सदावर्तेला फक्त पवारांच्या विरोधात गरळ ओकण्यासाठी तयार केलं गेलंय. कोणता राजकीय पक्ष त्यांना पोसतो, हे सर्वांनाच माहितीय. शिवसेनेनं नेहमीच कामगारांची पाठराखण केलीय, पण कालचा प्रकार दुर्दैवी आहे, असं त्यांनी म्हंटलंय.

Sanjay Raut vs Gunratna Sadavarte
या जन्मीचं कर्म याच जन्मात फेडावं लागतं; उदयनराजेंचा शरद पवारांना टोला

ते पुढं म्हणाले, सध्या ठाकरे आणि पवारांच्या विरोधात गरळ ओकण्याचा प्रयत्न सुरूय. ज्या प्रकारे भाजप नेत्यांच्या मी प्रतिक्रिया पाहिल्या, त्यानुसार कालपर्यंत राष्ट्रवादीत आणि आज भाजपत गेलेले नेते या हल्ल्याचं समर्थन करत आहेत. त्यामुळं एसटी कर्मचाऱ्याचं कालचं आंदोलन नव्हतं, तर तो हलला होता, अशा शब्दांत त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांवर टीका केलीय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com