Shrikant Shinde: मुख्यमंत्री 20 तास काम करतात, हे लोकांच्या डोळ्यांमध्ये खुपतंय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shrikant Shinde : "मुख्यमंत्री 20 तास काम करतात, हे लोकांच्या डोळ्यांमध्ये खुपतंय"

Shrikant Shinde : "मुख्यमंत्री 20 तास काम करतात, हे लोकांच्या डोळ्यांमध्ये खुपतंय"

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी पित्याच्या कामाचं कौतुक करत विरोधकांना चांगलाच टोला लगावला आहे. माध्यमांशी बोलताना खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 20 तास काम करतात, हे लोकांच्या डोळ्यांमध्ये खुपतंय. त्याचबरोबर विरोधकांना जिथं-तिथं फक्त एकनाथ शिंदेच दिसत आहेत. विरोधकांच्या तर स्वप्नातही एकनाथ शिंदे येतात, असंही ते म्हणाले आहेत.

दिवसातील 20 तास शिंदेसाहेब काम कसं काय करू शकतात? असं अनेकांना वाटतं असतं. या सगळ्या गोष्टी आता विरोधकांच्या डोळ्यांत खुपायला लागल्या आहेत. ही तर केवळ सुरुवात आहे. मी याआधीही सांगितलं आहे की, ये तो झाकी है पिक्चर अभी तुला बाकी है!, असं म्हणत श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

शिंदेसाहेब आता चांगलं काम करत आहेत. विरोधकांना पूर्ण वेळ केवळ शिंदेसाहेबच दिसतात. स्वप्नामध्ये पण शिंदे साहेब येतात. शिंदेसाहेब गणेश उत्सवामध्ये ज्या प्रकारे प्रत्येकाच्या घरी फिरले. फक्त गणेश उत्सव नाही, त्याबरोबर शासकीय कामकाजाचे सरकारचे निर्णय शिंदे साहेबांनी घेतले. एवढ्या मोठ्या प्रमाणात हा माणूस काम कसा करू शकतो? असा प्रश्न विरोधकांना पडला आहे, असंही खासदार श्रीकांत शिंदे म्हणालेत.

राज्यात जे सरकार आलं ते मेजॉरिटीचं सरकार आहे. बाकी लोक काय बोलत असतात. बोलणं त्यांच कामच आहे. विरोधी बाकावर बसल्यापासून त्यांच्याकडे करण्यासारखं काहीच उरलेलं नाही. त्यामुळे विरोधक सरकारवर टीका करत असतात, असंही श्रीकांत शिंदे म्हणाले आहेत.

Web Title: Mp Shrikant Shinde Said Chief Minister Eknath Shinde Works For 20 Hours

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..