तरुणांच्या प्रश्नाला सुप्रिया सुळेंनी फोडली वाचा; मुख्यमंत्री ठाकरेंकडे केली मागणी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 डिसेंबर 2019

सध्या राज्यात बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे. त्याचवेळी नोकरभरतीसाठी सुरू करण्यात आलेल्या महापोर्टलमधील गैरकारभारामुळं तरुण त्रस्त आहेत. तरुणांच्या या प्रश्नाला राष्ट्रवादी  काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वाचा फोडली आहे.

बारामती शहर : सध्या राज्यात बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे. त्याचवेळी नोकरभरतीसाठी सुरू करण्यात आलेल्या महापोर्टलमधील गैरकारभारामुळं तरुण त्रस्त आहेत. तरुणांच्या या प्रश्नाला राष्ट्रवादी  काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वाचा फोडली आहे. हा प्रश्न घेऊन त्यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे एप डाऊनलोड करा 

काय आहे मागणी?
शासकीय नोकरभरतीसाठी मागील सरकारने सुरु केलेली महापोर्टल सेवा बंद करावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. 

अजित पवारांनी केली विधानसभेत 'ही' चूक, वाचा काय म्हणाले...

या सेवेत पारदर्शकता नसल्याची तक्रार स्पर्धा परिक्षांची तयारी करणा-या विद्यार्थ्यांकडून सातत्याने होत असल्याने सुळे यांनी ही मागणी केली आहे. संवाद दौ-यानिमित्त राज्यातील अनेक युवकांशी संवाद साधला होता, त्या वेळे मांडल्या जाणा-या अडचणीत प्रामुख्याने महापोर्टलसेवेबाबतच्या तक्रारी होत्या.

प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न बघणा-या विद्यार्थ्यांच्या मार्गात महापोर्टल सेवा मदत ठरण्याऐवजी अडचण निर्माण करते अशा विद्यार्थ्यांच्या तक्रारी होत्या. युवकांच्या मागणीचा विचार करुन महापोर्टल सेवा बंद करून पूर्वीप्रमाणेच परिक्षा घेतली जावी, अशी मागणी सुळे यांनी उध्दव ठाकरे यांना लिहीलेल्या पत्रात केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Supriya Sule has demanded the closure of the government recruitment in a letter to Chief Minister Uddhav Thackeray