
संसदेच्या अधिवेशनानिमित्त मी दिल्लीत असलो, तरी माझे लक्ष पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पूर्णपणे महाराष्ट्र आणि विशेष करुन कोकण, पश्चिम महाराष्ट्राकडे आहे.
मी दिल्लीत असलो, तरी माझं लक्ष पश्चिम महाराष्ट्राकडं
सातारा : सध्या राज्यावर अस्मानी संकट घोंगावत असून राज्यासह जिल्ह्यांना (Heavy Rain In Maharashtra) याचा मोठा फटका बसला आहे. वित्तहानी कितीही झाली तरी आज ना, उद्या ती भरून काढता येईल. परंतु, या परिस्थितीत आपण आपल्या परिवाराची काळजी घेऊन बाधित भागातील मदतकार्यात सहभाग घेणे आवश्यक आहे. तसेच मदतकार्य वेगाने व प्रामाणिकपणे सुरु करावे. मदतकार्य करत असताना जनतेला कमीत-कमी त्रास होईल याचीही दक्षता प्रशासनाने घ्यावी, अन्यथा पूरग्रस्त (Flood In Satara Kokan Kolhapur) जनतेचे श्राप-अश्राप भोगावे लागतील, असे स्पष्ट मत खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांनी ट्विटव्दारे व्यक्त केले आहे. (MP Udayanraje Bhosale Expressed Concern Over The Flood Situation bam92)
ते पुढे म्हणाले, संसदेच्या अधिवेशनानिमित्त (Parliamentary session) मी दिल्लीत असलो, तरी माझे लक्ष पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पूर्णपणे महाराष्ट्र आणि विशेष करुन कोकण, पश्चिम महाराष्ट्राकडे (Western Maharashtra) आहे. या भागातील पूरस्थितीची आणि भौगोलिक परिस्थितीची माहिती आम्ही केंद्रीय गृहमंत्रालय, मदत मंत्रालयाला दिली असून, केंद्राकडून भरीव मदत मिळण्यासाठी पाठपुरावा सुरु केला आहे. पूरबाधित जिल्ह्यातील बाधितांना व अतिवृष्टीबाधित कुटुंबीयांना भक्कम आधार देण्यासाठी आवश्यक ते सर्व मदतकार्य पोहोचल पाहिजे, यासाठी आम्ही दक्षता घेत आहोत. महाराष्ट्रात विशेष करून कोकण, सातारा, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांमध्ये ढगफुटीसारख्या सतत कोसळणा-या पावसामुळे विविध कारणाने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. पूर येणे, दरडी कोसळणे, पुराच्या पाण्यात सर्वकाही वाहून जाणे, रस्त्यांवर पाणी साचून वाहतूक विस्कळीत होणे अशा अनेक घटना घडल्या आहेत.
तसेच वित्त हानी प्रचंड प्रमाणात झाली आहे. काही ठिकाणी जीवित हानी देखील झाली असून सरकारने मारले आणि आभाळ फाटले, तर दाद कुठे मागायची? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. निसर्ग आणि भोंगळ कारभाराचे अनेक फटके दुर्दैवाने गेल्या काही वर्षात काही अंतराने जरा जास्तच बसू लागले आहेत. त्यातच गेल्या दीड वर्षांपासून असलेल्या का नसलेल्या कोरोनाने जनता त्रासून गेली आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कटले आहे. संपूर्ण यंत्रणा कोलमडून गेली आहे. परंतु, कोणीही खचून जावू नका, निसर्गाने संकटे दिली तरी त्यातून मार्ग काढण्याची जिद्द आणि विवेक देखील निसर्गच देत असतो. सर सलामत तो पगड़ी पचास या उक्तीप्रमाणे आपले आणि आपल्या कुटुंबाचे बहुमूल्य जीवन महत्वाचे आहे. म्हणून, सावधानता बाळगून संयम ठेवा. संसार पुन्हा उभा करता येईल, त्यासाठी आम्ही स्वतः तातडीने शक्य ते सर्वप्रकारचे मदतकार्य सुरु करीत आहोत.

Landslide in Ambeghar
राज्य सरकारच्या पाठिशी केंद्र सरकार (Central Government) उभं आहे. विविध अशासकीय संस्था मदतकार्यासाठी पुढे आल्या आहेत. पूर येवून गेल्या ठिकाणी रोगराई पसरू नये, म्हणून आम्ही स्वच्छता दूतांचा समावेश असलेली पथके तयार केली आहेत. आर्थिक, सहाय्याबरोबरच श्रम सहाय्य देखील पुरविण्याचा आराखडा आम्ही हाती घेतला आहे. शासन कार्यवाहीला पूरक ठरेल असे कार्य हाती घेण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीत पूरस्थितीत सापडलेल्यांना आधार देण्याचे काम केले जाईल. निसर्गातील पाण्याला पुरेशी वाट मिळाली नाही, तर आजूबाजूला पूरपरिस्थिती निर्माण होते. तर मग आपल्या कार्यक्षेत्रातील नद्या, नाले, ओहोळ हे अरुंद झाले आहेत काय? याची शोध मोहीम प्रशासनाने हाती घेणे आवश्यक आहे.

NDRF Team
गेल्या काही दशकातील पर्जन्यमान आणि अलीकडच्या काळातील पर्जन्यमान याचा विचार करता, पाऊस पूर्वीपेक्षा कमी-कमी होत आहे. असे असताना अशा वारंवार घडणा-या घटनांमधून आपण बोध घेणार आहोत की नाही? हा खरा प्रश्न आहे. पूरपरिस्थिती निर्माण होण्याची वास्तववादी कारणे प्रशासनाने जाहीर केली पाहिजेत. वाहून गेलेले पूल आणि रस्त्यांची कामे कशी झाली होती. त्या-त्या वेळी क्वालिटी कंट्रोल टेस्टींग झाले आहे का, स्ट्रक्चरल ऑडिट झाले आहे का? इत्यादी बाबतची संपूर्ण माहिती सध्याची आपत्कालीन परिस्थिती निवळल्यावर का होईना, पण जनतेला द्यावी. पूर येण्याची जर मानवनिर्मित कारणे असतील तर त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करा, तत्पूर्वी मदतकार्य वेगाने करावे, अन्यथा जनतेचे श्राप-अश्राप सहन होणार नाहीत, असेही सडेतोड मत खासदार उदयनराजेंनी व्यक्त केले आहे. शिवाय, त्यांनी प्रशासनालाही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.
MP Udayanraje Bhosale Expressed Concern Over The Flood Situation bam92