एमपीएससीचे सुधारीत वेळपत्रक जाहीर; वाचा, केव्हा होणार परीक्षा? 

ब्रिजमोहन पाटील
Monday, 7 September 2020

राज्य सेवा पूर्व परीक्षा ११ ऑक्टोबर रोजी होणार आहे. दुय्यम सेवा अजराजपत्रीत गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २२ नोव्हेंबर तर अभियांत्रीकी संयुक्त परीक्षा १ नोव्हेंबर रोजी होणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. अभियांत्रिकी संयुक्त परीक्षेची पूर्वीची तारीख कायम ठेवली आहे. 

पुणे : 'कोरोना'चे कारण देत अचानक स्थगित केलेल्या महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांचे सुधारीत वेळपत्रक आज (ता. ७) जाहीर करण्यात आले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्य सेवा पूर्व परीक्षा ११ ऑक्टोबर रोजी होणार आहे. दुय्यम सेवा अजराजपत्रीत गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २२ नोव्हेंबर तर अभियांत्रीकी संयुक्त परीक्षा १ नोव्हेंबर रोजी होणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.अभियांत्रिकी संयुक्त परीक्षेची पूर्वीची तारीख कायम ठेवली आहे. 

कोरोनामुळे एप्रिल-मे महिन्यापासून एमपीएससीच्या परीक्षा वारंवार पुढे ढकलली जात आहे. आयोगाने राज्य सेवा पूर्व परीक्षा २० सप्टेंबर रोजी घेण्याचे निश्‍चीत केले होते. तर ऑक्‍टोबर व नोव्हेंबर मध्ये इतर दुय्यम सेवा अजराजपत्रीत गट ब व अभियांत्रीकी संयुक्त परीक्षा होणार होती. त्यासाठी लॉकडाऊनमुळे गावाकडे गेलेले काही तरुण पुन्हा पुण्यात परतले आहेत. तर गावाकडे असलेल्या उमेदवारांसाठी एपीएससीनेही परीक्षा केंद्र बदलण्याची मुभा दिली होती. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एमपीएससीच्या सर्वच परीक्षा पुढे ढकलल्याचे जाहीर केल्याने उमेदवार हतबल झाले आहेत. या निर्णयामुळे सरकारवर टीकेची झोड उठली होती. सरकारने त्वरीत नव्या तारखा घोषीत कराव्यात अशी मागणी केली जात होती. त्यानुसार एमपीएससीने तारखा जाहीर केल्या. 

बाउन्सरचा 'डोस'; रुग्णांच्या नातेवाइकांमध्ये दहशत

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत एप्रिल/मे, २०२० मध्ये आयोजित करण्यात असलेल्या तीन परीक्षा कोरोना (Covid-१९) विषाणूच्या व लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ऐनवेळी पुढे ढकलण्यात येऊन परीक्षांचे सुधारित दिनांक संदर्भिय प्रसिध्दीपत्रकानुसार जाहीर करण्यात आले होते. आयोगामार्फत आयोजित परीक्षांच्या-कोव्हिड परिस्थितीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे."

शासनाकडून घेण्यात आलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने आयोगामार्फत परीक्षांचे वेळपत्रक जाहीर झाले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने तसेच उमेदवार व परीक्षा आयोजनातील सर्व कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठी आयोगाकडून शक्य त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या स्थितीच्या संदर्भात शासनाकडून वेळोवेळी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना व लॉकडाऊनचा कालावधी लक्षात घेऊन परीक्षेच्या आयोजनाच्या अनुषंगाने आयोगाकडून वेळोवेळी आढावा घेण्यात येईल. तसेच याबाबतची माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. 

पुण्यात रुग्ण फिरला तीन तास अन् उपचार पिंपरीत 

वेळपत्रक पुढील प्रमाणे (कंसात पूर्वीची तारीख) 

  • राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० - ११ ऑक्टोबर २०२० (२० सप्टेंबर २०२०) 
  • महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व -  २२ नोव्हेंबर, २०२० (११ ऑक्टोबर २०२०) 
  • महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा- १ नोव्हेंबर, २०२० (१ नोव्हेंबर २०२०) 
  •  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MPSC 2020 revised schedule announced