

MPSC Drug Inspector exam
esakal
Allegations Surface in MPSC Drug Inspector Recruitment Exam : नीट पेपरफुटीचे प्रकरण देशभरात गाजले असतानाचा आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. दोन उमेदवारांनी पुराव्यांसह परीक्षेच्या पेपरबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या उमेदवारांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या संपूर्ण भरती प्रक्रियेची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी तक्रारदार विद्यार्थ्यांनी केली आहे.