mpscesakal
महाराष्ट्र बातम्या
पुन्हा एकाच दिवशी दोन परीक्षा, निवडणुकीमुळे MPSCने परीक्षेची तारीख बदलल्यानंतरही गोंधळ
राज्यातील नगरपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल २१ डिसेंबर रोजी लागणार असल्यानं एमपीएससीने त्यादिवशीची परीक्षा ४ जानेवारी रोजी घेण्यात येईल असं जाहीर केलंय. पण आता पुन्हा एकाच दिवशी दोन परीक्षा होण्याची शक्यता निर्माण झालीय.
राज्यातील नगरपरिषदांच्या निवडणुकीचे निकाल २१ डिसेंबरला लागणार आहेत. याच दिवशी एमपीएससीच्या परीक्षेचं आयोजन केलं होतं. मात्र निवडणूक निकालामुळे या दिवशीची परीक्षा पुढे ढकलून ४ जानेवारी आणि ११ जानेवारीला घेण्याचा निर्णय एमपीएससीने घेतला. पण आता ४ जानेवारीला पुन्हा दोन परीक्षा होण्याची शक्यता निर्माण झालीय.
