
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार, ०१ जून, २०२५ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ चा निकाल दिनांक ०६ ऑगस्ट, २०२५ रोजी जाहीर करण्यात आला आहे. मात्र मुख्य परीक्षेनंतर निकालावर न्यायालयाचा काय परिणाम होणार याची माहिती देखील आयोगाने दिली आहे. या निकालाद्वारे मुख्य परीक्षेकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांची बैठक क्रमांकासह नावाची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.