MPSC Exam Date 2026 Update
esakal
MPSC Main Exams 2026 Postponed : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) 3 ऑक्टोबर 2026 पासून आयोजित करण्यात आलेल्या तीन महत्त्वाच्या मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये राज्य सेवा मुख्य परीक्षा 2026, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2026 आणि महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) मुख्य परीक्षा 2026 यांचा समावेश आहे. या परीक्षांच्या सुधारित तारखा आयोगाकडून स्वतंत्रपणे लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत.