

MPSC paper leak case: Mumbai Police arrested six accused, including three Maharashtra Public Service Commission officials
esakal
MPSC paper leak case: अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक (गट ब) पदासाठी २२ मार्च रोजी झालेल्या चाळणी परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी बुधवारी सहा जणांना अटक केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (एमपीएससी) तीन अधिकारी, तसेच नंदुरबारमधील कौटिल्य अकादमीशी संबंधित व्यक्तींचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणातील एका आरोपीनेच एमपीएससीला ईमेल पाठवून प्रश्नपत्रिका फुटल्याची तक्रार केली होती.