
एमपीएससीच्या उमेदवारांना खुशखबर; नववर्षात होणार मेगा भरती
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) आपल्याकडील परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना (MPSC Candidates) खुशखबर दिली आहे. यंदाच्या वर्षात राज्याच्या विविध विभागांमध्ये तब्बल 7 हजार 560 रिक्त जागा भरल्या जाणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. २०२१ मध्ये या जागा रिक्त असल्याची (mpsc posts recruitment) आणि त्या भरण्यासाठीच माहिती आयोगाने दिली असल्याने परीक्षांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवांरासाठी हे नववर्षे परीक्षांसाठी महत्वाचे ठरणार आहे. (mpsc post recruitments in new year 2022 as per mpsc board information)
हेही वाचा: नव्या वर्षात नवं टेन्शन; मुंबईतील हवा बिघडली!
सरळसेवा आणि स्पर्धा परीक्षा अशा दोन्ही गटांमध्ये सर्वाधिक रिक्त पदे ही सामान्य प्रशासन विभाग (273 /784), कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विभाग (776/ 148), गृह विभाग (647 /512), वित्त विभाग (4 /352), सार्वजनिक आरोग्य विभाग (937 सरळसेवा), वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग (1572 सरळसेवा), जलसंपदा (25/ 298) या विभागांमध्ये आहेत. या संदर्भातील सविस्तर रिक्त जागांची यादी 'एमपीएससी'च्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. यावर येत्या वर्षात या सर्व पदांसाठी परीक्षा घेऊन 'एमपीएससी'ने विद्यार्थ्यांना दिलासा द्यायला हवा. लवकरात लवकर आयोगाकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात याव्यात, अशी मागणी 'एमपीएससी' समन्वय समितीचे महेश घरबुडे यांनी केली आहे.
मागील काही महिन्यांमध्ये सरळसेवेद्वारे भरण्यात येणाऱ्या पदांमध्ये यंदा मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. राज्याच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये 'अ', 'ब' आणि 'क' गटांतील एकूण किती पदे रिक्त आहेत, याबाबतचे मागणीपत्र 'एमपीएससी'ने नुकतेच जाहीर केले असून त्यानुसार राज्याच्या २५ विभागांमधील तिन्ही गटांच्या एकूण ७ हजार ५६० जागा रिक्त आहेत. यातील ४ हजार ३२७ पदांसाठीच्या जाहीराती यापूर्वीच प्रसिद्ध झाल्या आहेत. या परीक्षा पुढील काही महिन्यात होणार आहेत. याचबरोबर उर्वरित ३ हजार २३३ जागांसाठीच्या परीक्षादेखील याच वर्षी घेण्यात येणार आहेत.
Web Title: Mpsc Post Recruitments In New Year 2022 As Per Mpsc Board Information Mpsc News Update
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..