
MPSC Main Exam Marathi News : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात (एमपीएससी) महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2022 मध्ये अंतिम पात्र ठरलेल्या उमेदवारांचे गुण आणि स्कॅन उत्तरपत्रिका त्यांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तसंच या गुणांच्या फेरपडताळणीसाठी वेब लिंकही उपलब्ध झाली आहे. त्यामुळं आपल्या अकाऊंटवर आलेले गुण तपासून त्यावर वेळेत कार्यवाही करण्याचं आवाहन आयोगाकडून करण्यात आलं आहे.