
Students Demand Postponement but MPSC Confirms State Services Prelims with Circular
Esakal
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने राज्यसेवा पूर्व परीक्षा २८ सप्टेंबरला घेतली जाणार आहे. मराठवाडा आणि विदर्भात अतिवृष्टीमुळे नुकसान झालंय. या भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा देणं कठीण असून तूर्तास परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी विद्यार्थ्यांसह अनेक संघटना आणि लोक प्रतिनिधींनीही केलीय. मात्र महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा घेण्यावर ठाम आहे. त्यांनी परीक्षेसंदर्भात परिपत्रक जारी केलंय. यात परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी सूचना देण्यात आल्या आहेत.