esakal | कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा: सरूडच्या दीर-भावजेची बाजी ; MPSC Result:
sakal

बोलून बातमी शोधा

Rohini Patil,Amit Patil

रोहिणी पाटील तहसीलदारपदावरून पोलिस उपअधीक्षक, तर अमित पाटील करनिर्धारण अधिकारी पदावरून नायब तहसीलदार झाले.

MPSC Result: कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा: सरूडच्या दीर-भावजेची बाजी

sakal_logo
By
टीम ईसकाळ टीम

कोल्हापूर, सरूड, बोरपाडळे : महाराष्ट्र लोकसेवा (MPSC Result) आयोगातर्फे झालेल्या राज्यसेवा परीक्षेच्या सुधारित निकालात सरूड (ता. शाहूवाडी) (Shahuwadi) येथील रोहिणी किरण पाटील (Rohini Patil) यांची पोलिस उपअधीक्षकपदी, तर अमित शिवाजी पाटील (Amit Patil) यांची नायब तहसीलदारपदी निवड झाली. हे दोघे सख्खे दीर-भावजय आहेत.

सातवे (ता. पन्हाळा) येथील प्रसन्नजित प्रकाश चव्हाण यांची उपजिल्हाधिकारीपदी वर्णी लागली. सरूड येथीलच अनिल पाटील यांची नायब तहसीलदारपदी व पेठवडगावच्या विजय सूर्यवंशी यांची पोलिस उपअधीक्षकपदी झालेली निवड कायम राहिली. नेर्लीतील (ता. करवीर) अरुण पाटील पोलिस उपअधीक्षक झाले.

आयोगातर्फे राज्यसेवेचा अंतिम निकाल गेल्या वर्षी जाहीर झाला होता; मात्र मराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीमुळे मुलाखत प्रक्रिया नव्याने घेऊन सुधारित निकाल जाहीर करण्यात आला. रोहिणी पाटील तहसीलदारपदावरून पोलिस उपअधीक्षक, तर अमित पाटील करनिर्धारण अधिकारी पदावरून नायब तहसीलदार झाले. ते सध्या चिपळूण नगर परिषदेकडे करनिर्धारण अधिकारी म्हणून सेवेत आहेत. अनिल पाटील यांची नायब तहसीलदारपदी निवड झाली होती. ती कायम राहिली. पेठवडगावचे विजय सूर्यवंशी २०१८ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन पोलिस उपअधीक्षक झाले होते.

राज्यसेवा परीक्षेत त्यांना तिसऱ्या प्रयत्नात यश मिळाले. त्यांची त्याच पदावर निवड कायम राहिली.तात्यासाहेब कोरे वारणा महाविद्यालयातून बी. ई. मेकॅनिकल झालेल्या प्रसन्नजित यांची विक्रीकर निरीक्षक, तहसीलदार व एक्साईज पोलिस उपअधीक्षक पदावर निवड झाली होती. ते आता उपजिल्हाधिकारी झाले. सध्या ते मुंबईत पोलिस उपअधीक्षक पदावर कार्यरत आहेत. त्यांचे आरळे येथे प्राथमिक, सातवे हायस्कूलमधून माध्यमिक, तर वारणानगर महाविद्यालयातून महाविद्यालयीन शिक्षण झाले. निवृत्त केंद्रप्रमुख प्रकाश चव्हाण यांचा तो मुलगा आहे. अरुण पाटील यांची याआधी उपजिल्हाधिकारीपदी निवड झाली होती. ते सुधारित निकालात पोलिस उपअधीक्षक झाले.

दीर-भावजयीचे लख्ख यश !

दरम्यान, अमित व रोहिणी सख्खे दीर-भावजयी आहेत. अमित २०१७ मध्ये पोलिस उपनिरीक्षक, तर २०१८ मध्ये करनिर्धारण अधिकारी झाले. रोहिणी ‘बीडीओ’नंतर कक्ष अधिकारी झाल्या. त्यांची आता पोलिस उपअधीक्षक पदावर वर्णी लागली.

हेही वाचा: World Heart Day 2021: डिजिटल, टेलिमेडिसीनच्या पर्यायातून जीवदान शक्य

ग्रामीण भागातील युवकांनी मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत. मी ग्रामीण भागातील आहे. रोज सुमारे १२ तास अभ्यास करून यश मिळविले. ग्रामीण भागातील प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न करेन.

- प्रसन्नजित चव्हाण

loading image
go to top