MPSC Marks Verification : एमपीएससी उमेदवारांसाठी मोठी बातमी! गुणपडताळणीसाठी अर्जाची संधी; जाणून घ्या अंतिम तारीख

MPSC ने राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ च्या उमेदवारांना गुणांची फेरपडताळणी करण्याची संधी दिली आहे. २५ऑगस्ट २०२६ रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर काही उमेदवारांच्या गुणांमध्ये मोठी तफावत आढळली.
MPSC State Services Main Exam 2025 Marks Verification

MPSC State Services Main Exam 2025 Marks Verification

esakal

Updated on

MPSC State Services Main Exam 2025 Marks Verification : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ च्या उमेदवारांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्य परीक्षेच्या निकालानंतर काही उमेदवारांच्या गुणांमध्ये मोठी तफावत आढळून आल्याने विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची दखल घेत आयोगाने गुणांच्या फेरपडताळणीची संधी उपलब्ध करून दिली आहे. इच्छुक उमेदवारांना १० सप्टेंबर २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com