'एमपीएससी'च्या विद्यार्थ्यांना दिलासा! परीक्षा केंद्र बदलण्याची दिली मुभा

ब्रिजमोहन पाटील
Wednesday, 19 August 2020

एमपीएससीच्या वेळापत्रकानुसार "महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा २०२०" ३ मे, २०२० रोजी होणार होती. पण कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने व लॉकडाऊनचा कालावधी लक्षात ही परीक्षा ११ ऑक्टोबर २०२० रोजी निश्चीत केले आहे.

पुणे : सप्टेंबरमध्ये होणाऱ्या राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी उमेदवारांना जिल्हास्तरावर परीक्षा केंद्र बदलून देण्यास महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) असमर्थता दाखवली होती. मात्र, आता ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या  महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षेसाठी उमेदवारांना त्यांच्या जिल्ह्यात परीक्षा केंद्र निवडता येणार आहे. त्यासाठी २१ ऑगस्ट ते २६ ऑगस्ट अशी मुदत दिली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

एमपीएससीच्या वेळापत्रकानुसार "महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा २०२०" ३ मे, २०२० रोजी होणार होती. पण कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने व लॉकडाऊनचा कालावधी लक्षात ही परीक्षा ११ ऑक्टोबर २०२० रोजी निश्चीत केले आहे. अर्ज भरताना बहुसंख्य उमेदवारांनी परीक्षा केंद्र हे पुणे, मुंबई, औरंगाबाद , नागपूर ही शहरे निवडली आहेत. पण लाॅकडाऊन मुळे बहुतांश उमेदवार त्यांच्या मूळ गावी गेले आहेत. सद्यस्थितीत प्रवासावरील व तात्पुरत्या वास्तव्यावरील निर्बंध याचा विचार करताहे उमेदवार परीक्षेसाठी या शहरांमध्ये येणे धोकादायक आहे. त्यामुळे सर्व उमेदवारांना त्यांच्या पसंतीचे जिल्हाकेंद्र निवडण्याची मुभा देण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.  उमेदवाराने निवडलेले जिल्हाकेंद्र रदद करण्यात येत आहे. 

आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील उमेदवारांच्या प्रोफाईलदवारे २१ ऑगस्ट   दुपारी १४.०० ते २६ ऑगस्ट २३.५९ वाजेपर्यंत उमेदवारांना त्यांच्या पसंतीचे जिल्हाकेंद्र निवडण्याची संधी पुन्हा उपलब्ध करुन आली आहे. संबंधित जिल्हयांमधील शाळा/महाविद्यालयाच्या स्थानिक पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेनुसार प्रत्येक जिल्हा केंद्रावर उमेदवारांना प्रवेश द्यायवायाची कमाल क्षमता निश्चित करण्यात येत आहे. सदर क्षमता लक्षात घेवून 'प्रथम येणाऱ्यास प्राधान्य" या तत्वानुसार जिल्हाकेंद्र निवडण्याची मुभा असेल. संबंधित  जिल्हाकेंद्राची कमाल क्षमता संपुष्टात आल्यानंतर त्या जिल्हाकेंद्राची निवड उमेदवारांना करता येणार नाही. 

धरणाचे पाणी आम्हाला मिळत नाही, मग आम्ही जमिनी का द्यायच्या? शेतकऱ्यांचा शासनाला...

विहित कालावधीत जिल्हाकेंद्राची निवड न करणाऱ्या उमेदवारांना प्रस्तुत परीक्षेच्या त्यांच्या अर्जामधील कायमस्वरुपी  रहिवासाचा पत्ता असलेल्या जिल्हयांतील परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यात येईल. (५) एखाद्या जिल्हाकेंद्राची क्षमता संपुष्टात आल्यानंतर जिल्हाकेंद्राची निवड न करणा-या अथवा निवड करु न  शकलेल्या उमेदवाराला आयोगाकडून उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या जिल्हाकेंद्रावर परीक्षेसाठी उपस्थित राहणे अनिवार्य आहे.

नव्याने जिल्हा केंद्र निवडण्याकरीता सर्व उमेदवारांना त्यांच्या आयोगाकडील नोंदणीकृत मोबाईल दूरध्वनी  क्रमांकावर लघुसंदेशादवारे (एसएमएस) कळविण्यात येईल, असे आयोगाने काढलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे. 

गणेशोत्सवात 'या' चार दिवशी ध्वनीवर्धक रात्री बारापर्यंत सुरू राहणार; पुणे पोलिसांनी केले जाहीर!​

म्हणून झाला निर्णय
२० सप्टेंबर रोजी राज्य सेवा पूर्व परीक्षा होत आहे. या परीक्षेसाठी परीक्षा केंद्र मुळ जिल्ह्यात बदलून द्यावे अशी मागणी उमेदवारांनी केली होती. मात्र, त्याची व्यवस्था करण्यासाठी कमी कालावधी असल्याने आयोगाने नकार दिला. त्याऐवजी महसुली मुख्यालयाच्या ठिकाणी परीक्षा केंद्र बदलून देण्याची व्यवस्था केली. पण उमेदवारांची यामुळे ही गैरसोय होत असल्याने महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षेला सरसकट केंद्र बदलून देण्यातचा हा निर्णय घेण्यात आला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MPSC students allowed to change examination centers