महावितरणच्या टोल फ्री क्रमांकात बदल 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 एप्रिल 2018

मुंबई - वीज गायब झाल्यावर महावितरणला विचारणा करण्यासाठीचा टोल फ्री क्रमांक बदलण्यात आला आहे. राज्यातील वीजग्राहकांना 19120, 1800-102-3435 आणि 1800-233-3435 असे तीन नवे टोल फ्री क्रमांक देण्यात आले आहेत. ग्राहकांना या टोल फ्री क्रमांकाद्वारे महावितरणच्या विविध योजनांची माहिती मिळविता येईल. तक्रारींचे निराकरणही करता येईल. 

टोल फ्री क्रमांकाची सुरवात झाल्यापासून महावितरणच्या ग्राहकांनी विविध कारणांसाठी या सेवेचा वापर केला आहे. दोन वर्षांत जवळपास 38 लाख ग्राहकांनी विजेशी संबंधित तक्रारी, विचारपूस, वीजजोडणी, नावात आणि पत्त्यात बदल अशा गोष्टींसाठी फोन केले होते. 

Web Title: MSEDCL toll free number change

टॅग्स