

Maharashtra government transport bus upgrade news
esakal
Maharashtra ST bus modernization : (विष्णू मोहिते) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवाशांसाठी ३ x २ अशी बैठक व्यवस्था असलेल्या अत्याधुनिक सुविधांनी सज्ज ‘राजमाता जिजाऊ’ बस सेवेची सुरुवात होणार आहे. जास्त प्रवाशांची वाहतूक करणे आणि एसटीच्या ताफ्यात आरामदायी गाड्यांची संख्या वाढवणे, हा या मागचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमांतर्गत राज्यभरात टप्प्याटप्प्याने सुमारे तीन हजार बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. सांगली विभागाने महामंडळाकडे १६० बसेसची मागणी केली आहे. या नव्या बसमुळे ‘लालपरी’चा प्रवास आता अधिक सुखकर होण्यास मदत होणार आहे.