MSRTC: महावितरणला फायदाच फायदा, ST मात्र अजूनही तोट्यातच; काय आहे परिस्थिती?

गेल्या काही महिन्यांपासून एसटीचे कर्मचारी पगारवाढ आणि इतर मागण्यांसाठी आंदोलन करतायत.
MSRTC
MSRTCSakal

राज्यातल्या प्रमुख शासकीय आस्थापनांना मोठा तोटा सहन करावा लागत असल्याचं दिसून येत आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाला ९४० कोटी, मुंबई पुणे दृतगती मार्ग मर्यादित संस्थेला २९० कोटी तर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला २०२०-२१ वर्षांत १४२ कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे.

गुरुवारी याविषयीचा सविस्तर हिशोब अधिवेशनामध्ये सादर करण्यात आला. तर दुसरीकडे महावितरणला मात्र ४३९ कोटींचा फायदा झाला आहे. तसंच पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळालाही २५६ कोटींचा फायदा २०२०-२१ या साली झालेला आहे. गेल्या काही महिन्यांपासून राज्य परिवहन मंडळाचे कर्मचारी पगारवाढ आणि इतर मागण्यांसाठी आंदोलन करत आहे.

सध्या अस्तित्वात असलेल्या ९० सार्वजनिक क्षेत्रातल्या उपक्रमांपैकी ४३ उपक्रमांना २,०३५ कोटींचा फायदा झाला असून २९ उपक्रमांना १,५८९ कोटींचा तोटा झालेला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com